चित्रपट कर्तबगार

कर्तबगारएच.पी. मुव्हीज प्रस्तुत 'हेमंत पाटील' निर्मित 'महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती' आघाडीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या जीवनावर आधारित 'कर्तबगार' या चित्रपटाचे चित्रीकरण सातार्‍यात सुरू असून हे चित्रीकरण क्षेत्र माहुली, गेस्ट हाऊस.,राजवाडा व राज्य मंगल कार्यालय या परिसरात सुरू आहे. आजच्या तरुणांनी 'कर्तबगार' हा चित्रपट आवर्जून पाहावा. कारण सध्याच्या वास्तववादी घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा असून आजच्या तरुणांना नवी दिशा देण्यास 'कर्तबगार' हा चित्रपट मैलाचा दगड ठरेल, असे मत प्रसिद्ध अभिनेते संजय मोहिते यांनी केले.




एका सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गाव गुंड राजकीय पुढारी व समाजाच्या विरोधावर मात करून आपले कर्तृत्व कसे समाजाला दाखवून दिले हे 'कर्तबगार' हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या कळेल.असे मत चित्रपटाचे निर्माते 'हेमंत पाटील' यांनी व्यक्त केले. या चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील असून दिग्दर्शक, कथा, पटकथाकार सिद्धार्थ मोरे आहेत. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते निलेश गुजर आहेत.



या चित्रपटात मोहन जोशी, नागेश भोसले असे दिग्गज कलाकार काम करत असून या चित्रपटाचे छायाचित्रण नंदू पाटील यांचे असून सुप्रसिद्ध संगीतकार हर्षित अभीराज यांनी या चित्रपटास संगीत दिले आहे. या चित्रपटाचे स्थिर छायाचित्रण हिरालाल आतार यांचे आहे. या दिग्गज कलाकारांबरोबर अनेक नवोदितांना या चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. 'कर्तबगार' हा चित्रपट राज्यातील सर्व रसिक प्रेक्षकांना आवडेल, असे प्रतिपादन चित्रपटाचे निर्माते हेमंत पाटील यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर