मराठी चित्रपट तोडफोड

आगामी प्रदर्शित होणारा 'तोडफोड' या मराठी चित्रपटाद्वारे हिंदीतील प्रसिद्ध खलनायक शिवा रिंदानीने मराठीत पदार्पण केले आहे. गेली तीन दशके अनेक हिंदी चित्रपटांतून स्वत:च्या अभिनयाची झलक त्याने दाखवून दिली आहे. याच अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीने त्याची दखल घेतली व नव्या उमेदीचे निर्माते- दिग्दर्शक अशोक सूर्यवंशी यांच्या आगामी चित्रपटात शिवा रिंदानी हा इन्स्पेक्टरच्या भूमिकेत पडद्यावर झळकतोय. हम, गोपी किशन, बॉर्डर, मुद्रांक, देशद्रोही, घातक इत्यादी चित्रपटांतील त्याच्या भूमिका विशेष लक्षात राहणार्‍या आहेत. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चश्मेबद्दूर' या चित्रपटातून त्याने अभिनयाचा श्रीगणेशा केला. तेव्हापासून आजपर्यंत अनेक चित्रपटांतून तो आपणास दिसत आहे.
सद्याच्या समाजात घडणार्‍या वास्तवादी ज्वलंत विषयाची हाताळणी या चित्रपटात केली असून सामाजिक राजकीय व समाजप्रबोधनात्मक अशा विषयांची या चित्रपटात मांडणी करून त्यावर भाष्य केले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत नवा चेहरा नीलेश राठोड व पायल शिंदे व हिंदीतील प्रसिद्ध खलनायक शिवा रिंदानी तसेच ज्येष्ठ कलाकार किशोर नांदलस्कर, जयमाला इनामदार, राघवेंद्र कडकोळ हे कलाकार असून सहकलाकार विशाल सूर्यवंशी, प्रतीक सूर्यवंशी व षिकेश सूर्यवंशी आदी कलाकारांचा अभिनय आपणास पाहावयास मिळेल. तसेच चित्रपटाचे प्रसिद्धीप्रमुख रामकुमार शेडगे हे आहेत. या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक व लेखक अशी तिहेरी बाजू अशोक सूर्यवंशी यांनी सांभाळली असून छाया इम्रान नझीर, संगीत राहुल पवार, गीते संजय कुशेकर व जनार्दन धुमाळ यांची असून या चित्रपटात एकूण तीन गीते आपणास पाहावयास मिळतील. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल, असे चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर