प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यकृतीवर तयार होत असलेल्या 'चांदील' या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना न्यायालयीन लढाईत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच रेकॉर्ड करण्यात आले आणि त्यावर गायक अवधूत गुप्ते प्रचंड खूशही झाला. सुरेश वाडकरांच्या सांताक्रुझ येथील आजिवासन स्टुडिओमध्ये या गाण्याचे रेकॉर्डिग करण्यात आले. वास्तविक या गाण्यातला फक्त पहिला मुखडा अवधूत गाणार होता आणि बाकीचे उर्वरित गाणे या चित्रपटाचे संगीतकार प्रवीण कुवर गाणार असे आधीच ठरलेले होते; पण या गीताची चाल आणि बोल अवधूतला इतके आवडले की फक्त मुखडाच नाही तर हे सगळे गाणे आपणच गाणार, असे अवधूतने सांगितले. अवधूत गुप्तेसारख्या प्रतिभासंपन्न गायकाचा आवाज लाभतोय म्हणजे हे गीत एक वेगळी उंची नक्कीच गाठेल, असा विश्वास या चित्रपटाचे संगीतकार प्रवीण कुवर, गीतकार मीना गोविंद, लेखक अनिल पवार आणि दिग्दर्शक समीर नाईक यांना असल्याने सगळ्यांनीच आनंदाने अवधूत गुप्तेच्या या प्रस्तावाला लगेच होकार दिला आणि 'चांदील'ला अवधूत गुप्तेच्या सोनेरी आवाजाचा स्पर्श झाला.

Comments