'कमाल धमाल मालामाल'

कॉमेडीशिवाय अँक्शन, डान्स, संगीत यांचा फूल डोस म्हणजे 'कमाल धमाल मालामाल' हा चित्रपट आहे. हा एक आगळा वेगळा चित्रपट आहे. स्क्रिप्टनुसारच यात कलाकारांचा भरणा करण्यात आलेला आहे. सर्वच कलाकारांचा स्वाभाविक अभिनय यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचे संगीत साजीद-वाजीद यांचे आहे. परसेप्ट पिक्चर्सचे सहसंचालक आणि निर्माता शैलेंद्र सिंग सांगतात की, हा चांगल्या कलाकारांचा एक गुच्छ आहे. प्रियदर्शन यांच्या सारखा कसलेला दिग्दर्शक या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. सुमारे आठ वर्षानंतर नीरज व्हारा आणि प्रियदर्शन यांची जोडी लेखक-दिग्दर्शक म्हणून एकत्र येत आहे. प्रियदर्शन यांच्या अंदाजाच्या मनोरंजनाचा हा चित्रपट आहे. यात भावनाप्रधानाबरोबरच हास्याचे कारंजे उडणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाचे हसत स्वागत करण्यासाठी सारे तत्पर झाले आहेत. हसण्यासारखे दुसरे कोणतेही औषध नाही, एवढेच खरे!

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर