आम्ही चमकते तारेचे संगीत प्रकाशन संपन्न

मराठी सिनेमाची पताका ऑस्करपर्यंत फडकावून मराठी सिनेसृष्टीला उर्जितावस्थेत आणण्यासाठी मार्गदर्शक ठरलेल्या 'श्वास' या मराठी सिनेमाच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या दीपक एस. चौधरी आणि 'रमाबाई आंबेडकर'सारखा बहुचर्चित चित्रपट देणार्‍या प्रकाश जाधव यांचा 'आम्ही चमकते तारे' हा आगामी सिनेमा मागील काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. केवळ मनोरंजनच न करता सामाजिक बांधिलकीचे भान राखत गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपासारखे सामाजिक कार्य करण्यात महत्त्वाचा वाटा उचललेला दीपक एस. चौधरी आणि प्रकाश जाधव यांचा 'आम्ही चमकते तारे' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज असून सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरामध्ये आम्ही चमकते तारेचे संगीत प्रकाशन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकासमंत्री वर्षाताई गायकवाड, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार बाळा नांदगावकर आणि आमदार प्रवीण दरेकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय सिनेमातील कलाकार मंडळी तसेच तंत्रज्ञही आम्ही चमकते तारेच्या संगीत प्रकाशन सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी उपस्थित होती.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर