प्रियंकाचा हरित मोहिमेला सपोर्ट
गणेशोत्सव सुरू होत आहे. तसेच संपूर्ण शहर या उत्सवाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. आपली बॉलीवूड अभिनेत्री पिग्गी चॉप्स ऊर्फ प्रियंका चोप्रा नेहमीच पर्यावरण संरक्षणाकरिता प्रयत्नरत असते. तिनेदेखील आता गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात केली आहे. प्रियंका चोप्राने 92.7 बिग एफएमच्या बिग ग्रीन गणेश मोहिमेला पा¨ठबा दर्शवत वर्तमानपत्रे दान केली आहेत, ज्यांचा वापर पेपर मॅशद्वारे श्री गणेशाची पर्यावरण-हितकारक मूर्ती बनविण्यामध्ये करण्यात येईल. प्रियंका चोप्राने नेहमीच हरित उपक्रमांना पा¨ठबा दर्शविला आहे. तसेच तिला पर्यावरणीय मोहिमेकरिता ग्रीन स्टाईल स्टेटमेंट अँम्बेसेडर म्हणून ओळखले जाते. शुभ कार्याचे यश व चांगल्या भाग्याकरिता
श्री गणेशाचा आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. तसेच असे वाटते की, श्री गणेशाच्या प्रति प्रियंकाची श्रद्धा तिच्या आगामी चित्रपटांशी जुडलेली आहे. उल्लेखनीय बाब ही आहे की, प्रियंकाचे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. 'बर्फी' चित्रपटामध्ये तिने एका ऑटिस्टिक मुलीची भूमिका साकारली आहे. तसेच तिचा आणखी एक चित्रपट 'सिंगल इन माय सिटी'देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच तिचा आंतरराष्ट्रीय अल्बमदेखील पुढच्या आठवडय़ात रिलीज होणार आहे. असे वाटते की, प्रियंकाला या चित्रपट व अल्बमकरिता बाप्पाचा आशीर्वाद मिळेल. तसेच याकरिता पर्यावरणीय मोहिमेला पा¨ठबा दर्शविण्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकेल!

Comments