ई फिल्म फेस्टिव्हल
ई फिल्म फेस्टिव्हल (एमएफएफ) या मुंबईतील सांस्कृतिक दिनदर्शिकेतील महत्त्वपूर्ण कार्यक्रमाची 14 वी आवृत्ती रिलायन्स एंटरटेन्मेंट आणि अमेरिकन एक्स्प्रेस यांनी सादर केली असून मुंबई अँकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम 18 ते 25 ऑक्टोबर 2012 रोजी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स (एनसीपीए) आणि इनॉक्स, नरिमन पॉईंट, लिबर्टी सिनेमाज, मरीन लाईन्स येथे मुख्य महोत्सव स्थान आणि सिनेमॅक्स, अंधेरी आणि सिनेमॅक्स सायन येथे हे चित्रपट पाहता येतील.
14 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलअंतर्गत 200 हून अधिक चित्रपटांचे स्टेलर लाईन अप मिळणार असून अन्य महत्त्वपूर्ण बाबींची माहिती आज एनसीपीएमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मिळणार आहे. या वेळी चित्रपटनिर्माते आणि मामीचे अध्यक्ष श्री श्याम बेनेगल, रिलायन्स एण्टरटेन्मेंटचे अध्यक्ष आणि मामीचे विश्वस्त अमित खन्ना, तसेच चित्रपटनिर्माते आणि मामीचे विश्वस्त असलेले सुधीर मिश्र आणि रमेश सिप्पी, मुंबई फिल्म फेस्टिव्हलचे संचालक श्रीनिवासन नारायणन, रिलायन्स एण्टरटेन्मेंटचे सीईओ संजीव लाम्बा, अमेरिकन एक्स्प्रेस इंडियाचे अध्यक्ष संजय रिषी यांच्यासह राजदूत आणि भारतीय मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपास्थित होते.
या वर्षी या महोत्सवामध्ये भारतीय चित्रपटांकरिता नवीन स्पर्धा अंतर्भूत करण्यात आली असून 'इंडिया गोल्ड 2012' अंतर्गत 13 भारतीय भाषांमधील चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असून नवोदित निर्माते अंदाजे 31,000 यूएसडीच्या रोख रकमेकरता परस्परांशी स्पर्धा करतील. याखेरीज 'इंटरनॅशनल कॉम्पिटिशन', ' सेलिब्रेट एज' आणि 'डायमेन्शन्स मुंबई' यासारख्या अन्य स्पर्धाही ठेवण्यात आल्या आहेत. या वर्षासाठी एकूण पारितोषिकांची रक्कम 220,000 यूएसडी इतकी आहे. भारतीय चित्रपटाचा शतकोत्सव साजरा करताना या महोत्सवांतर्गत निवडक भारतीय मूकपट लाईव्ह ऑक्रेस्ट्रॉसह प्रदर्शित केले जाणार आहेत. या चित्रपटांमध्ये 'कालिया मर्दन', 'राजा हरिश्चंद्र', 'मार्तड वर्मा', 'थ्रो ऑफ डाईस', ' सती सावित्री', ' जमाई बाबू', 'गॅलिअंट हार्ट', यांचा समावेश आहे.
सलग दुसर्या वर्षी एम्बसी ऑफ फ्रान्स इन इंडिया आणि युनिफ्रान्सच्या सहकार्याने 'रांदे-कूज विथ फ्रेंच सिनेमा' विभागाचा एक भाग म्हणून उत्कृष्ट समकालीन फ्रेंच चित्रपट प्रदर्शित केला जाईल. अन्य वैशिष्टय़ांमध्ये इटालियन सिनेमाचा इतिहास सांगितला जाणार असून भारतातील एम्बसी ऑफ इटलीच्या वतीने आयोजित केला जाणार आहे. या वेळी चित्रपट शिक्षणतज्ज्ञ श्री इटालो स्पिनेली हेही सहभागी होणार असून अफगाणिस्तानातील निवडक चित्रपटही प्रदर्शित केले जाणार आहेत. यामध्ये काबूल फ्रेश - न्यू व्हॉईसेस इन अफगाण सिनेमाचा समावेश असून देशातील चित्रपट चळवळीचा प्रवास अधोरेखित केला जाणार आहे तसेच राजेश खन्ना, दारासिंग आणि ए. के. हंगल यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. अभिनेत्री वहिदा रेहमान यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या महोत्सवामध्ये चित्रपटांचे संवर्धन आणि संरक्षण याविषयी करण्यात येणार्या चर्चेमध्ये वर्ल्ड सिनेमा फाऊंडेशन, फिल्म फाऊंडेशन, ट्वेंटिथ सेंच्युरी फॉक्स आर्काईव्ह आणि अँकॅडमी फिल्म आर्काईव्ह ऑफ दि अँकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँण्ड सायन्समधील मान्यवरांचा समावेश आहे.

Comments