प्रेम चे चित्रिकरणाचे शुरु

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी दिग्दर्शिकेच्या रूपात कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या शब्दांत दडलेला प्रेमाचा नवा अर्थ मांडण्यासाठी सज्ज झाली आहे. मृणालच्या दिग्दर्शनाखाली बनणार्‍या 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतंय' या सिनेमाच्या दुसर्‍या शेडय़ुल्डचे चित्रीकरण पुण्यातील चांदणी चौक परिसरातील पेरंगुट रोड या ठिकाणी एका जलाशयाला खेटून असलेल्या एका टुमदार बंगल्यात सुरू आहे. या सिनेमाच्या निमित्ताने निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा आनंद मिळत असल्याने प्रेमासारख्या संवेदनशील विषयावर आधारित असलेला मृणाल कुलकर्णीचा सिनेमा निसर्गरम्य वातावरणात बहरतोय असे म्हणता येईल. या शेडय़ुल्डमध्ये सचिन खेडेकर, सुनील बर्वे, सुहास जोशी, मोहन आगाशे, नेहा जोशी आदी कलाकार सहभागी झाले आहेत.

या सिनेमात सुनील बर्वे मृणालच्या पतीची भूमिका साकारतोय. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतंय' ही एक मिडल एज लोकांची कथा असल्याचं सुनील म्हणाला. आजवर कधी आई तर कधी सासूच्या भूमिकांमध्ये दिसणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या सिनेमात सुनीलच्या आईच्या आणि मृणालच्या सासूच्या भूमिकेत दिसतील. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतंय'मध्ये पुन्हा एकदा सासू साकारण्याची संधी मिळाली असली तरी ही टिपिकल हिंदी स्टाईलची सासू नसून प्रॅक्टिकल आहे. शाळेत प्रिन्सिपल असून जीवनातही आपल्या प्रिन्सिपल'वर तिचा ठाम विश्वास आहे. या सिनेमाची कथा लिहिताना मृणालने प्रेमाचा नाजूक धागा पकडला असून तो प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास सुहास जोशी यांनी व्यक्त केला. अमोल प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनणार्‍या या सिनेमाचे निर्माते सचिन पारेकर असून भूपत बोदर प्रस्तुतकर्ता आणि कौशल प्रवीण ठक्कर सहनिर्माते आहेत. सिनेमाची कथा मृणालची असून पटकथा-संवाद मनीषा कोरडे यांचे आहेत. सौमित्र यांनी या सिनेमासाठी लिहिलेल्या गीतांना मिलिंद इंगळे आणि सुरेल इंगळे या पिता-पुत्र जोडीने संगीत दिले आहे. मृणाल कुलकर्णीसह सचिन खेडेकर, पल्लवी जोशी, मोहन आगाशे, सुहास जोशी, सुनील बर्वे, स्मिता तळवळकर, नेहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येईल.



Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर