चित्रपट तोडफोड

तोडफोड14 सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शितआगामी प्रदर्शित होणारा 'तोडफोड' हा चित्रपट 14 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. या मराठी चित्रपटाद्वारे हिंदीतील प्रसिद्ध खलनायक 'शिवा रिंदानीं'ने मराठी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले आहे. अनेक हिंदी चित्रपटांत स्वत:च्या अभिनयाची झलक दाखवून गेली तीन दशके रसिकांच्या मनावर ते राज्य करत आहेत. याच अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीने त्यांची दखल घेऊन व नव्या उमेदीचे निर्माते-दिग्दर्शक अशोक सूर्यवंशी यांच्या 'तोडफोड' चित्रपटात 'शिवा रिंदानीं' हे इन्स्पेक्टरच्या भूमिकेत पडद्यावर झळकतील. हम, गोपी किशन, बॉर्डर, मुद्रांक, देशद्रोही, घातक इत्यादी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात राहणार्‍या आहेत. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चश्मे-बहाद्दूर' या चित्रपटातून त्यांनी अभिनयाचा श्रीगणेशा केला. तेव्हापासून ते आजपर्यंत अनेक चित्रपटांत ते आपणास पाहावयास मिळत आहेत.

चित्रपट कलाकार ते निर्माता-दिग्दर्शक असा लांबचा प्रवास अशोक सूर्यवंशी यांचा आहे. सूर्यवंशी हे अनेक मराठी, हिंदी सिनेमात झळकलेत, तर टीव्ही चॅनलवर तर त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. एवढा मोठा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सध्या समाजात घडणार्‍या वास्तववादी ज्वलंत विषयाची हाताळणी या चित्रपटात केली असून सामाजिक राजकीय व समाजप्रबोधनात्मक अशा विषयांची या चित्रपटात मांडणी करून यावर भाष्य केले आहे. पुण्यातील काही भागांतील गुन्हेगारीवर हा चित्रपट केला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत नवा चेहरा नीलेश राठोड व पायल शिंदे व हिंदीतील प्रसिद्ध खलनायक 'शिवा रिंदानीं तसेच ज्येष्ठ कलाकार किशोर नांदलस्कर, जयमाला इनामदार, राघवेंद्र कडकोळ हे कलाकार असून सहकलाकार विशाल सूर्यवंशी, प्रतीक सूर्यवंशी व षिकेश सूर्यवंशी आदी कलाकारांचा अभिनय आपणास पाहावयास मिळेल, तर चित्रपटाचे प्रसिद्धीप्रमुख रामकुमार शेडगे हे आहेत. या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक व लेखक अशी तिहेरी बाजू अशोक सूर्यवंशी यांनी सांभाळली असून छाया इम्रान नझीर, संगीत राहुल पवार, गीते संजय कुशेकर व जनार्दन धुमाळ यांची असून या चित्रपटात एकूण 3 गीते आपणास पाहावयास मिळतील. हा चित्रपट लवकर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल, असे चित्रपटाचे निर्मात्यांनी नुकत्याच पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.



Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA