मिफ्टामध्ये चित्रपट, नाटकांबरोबर खवय्यांचीही मज्जा

ठाणे शहर हे उपसांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. अशा या ठाणे शहरात गेली आठ दिवस म्हैस्कर मिफ्टा नाटय़-चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील नाटक आणि चित्रपटांनी तर रसिकांवर भुरळ पडली असताना दुसरीकडे खाद्यप्रेमींसाठी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थाची मेजवानी चाखायला मिळाली.
ठाण्यातील खवय्यांसाठी खास त्यांची आवड लक्षात घेता या महोत्सवाच्या दरम्यान फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. काहीजणांना बर्‍याच वेळा आपल्या घरातील जेवणाचा कंटाळा येतोच. त्यातच काहीतरी वेगळेपणा हवा असतो. असाच वेगळेपणा येथे पाहावयास मिळाला. या महोत्सवाच्या निमित्ताने नाटक आणि चित्रपटांचा आनंद घेताना नवनवीन खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतानाचे चित्र पाहायला मिळाले.या फूड फेस्टिव्हलमध्ये एकूण पाच प्रकारच्या हॉटेलची रचना केली होती. यात मालवणी मसाळा, समर्थ कॅटर्स, हॉटेल तुळजापूर, समाधान कॅटर्स यांत शाकाहारामध्ये पुरणाची पोळी, मोदक तसेच सर्व प्रकारच्या भाज्या, भाकरी, बिर्याणी, घावणे इत्यादी सर्व प्रकारचे तर मांसाहारामध्ये सर्व प्रकारचे मासे, चिकन, मटण, बिर्याणी, वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन प्रकार खावयास मिळत होते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्सही खावयास मिळत होते. या व्यावसायिकांना कार्यक्रमाच्या तिसर्‍या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. यात त्यांना दिवसाला सहा ते सात हजारांचा व्यवसाय होत असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. या फूड फेस्टिव्हलचा ठाणेकर खवय्यांनी पुरेपूर फायदा उचलला असल्याचे दिसले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर