देऊळ ची डेन्मार्क फेस्टिवल मध्ये झेप

'देऊळ'ने डेन्मार्कमध्ये फडकवली मराठीची पताकामराठी सिनेमा दिवसेंदिवस नवनवीन शिखरे सर करत जागतिक पातळीवर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यशस्वी होत आहे. राष्ट्रीय पारितोषिकापर्यंत मजल मारणार्‍या दिग्दर्शक उमेश कुलकर्णीचा 'देऊळ' हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो डेन्मार्कमधील चित्रपट महोत्सवामुळे. डेन्मार्कमधील कोपेंगन येथे संपन्न झालेल्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवून गौरवण्यात तर आलाच पण या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी खास उमेश आणि अनुराग कश्यप यांना आमंत्रित करण्यात आले होते.

सशक्त कथानक, उत्तम मांडणी आणि पात्रांना साजेशी कलाकारांची निवड या कारणांमुळे उमेश कुलकर्णीच्या 'देऊळ' सिनेमाने प्रथम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर राष्ट्रीय पारितोषिकापर्यंत झेप घेतली आणि आता डेन्मार्क फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचा मान पटकावला.'देऊळ'सारख्या एखाद्या मराठी सिनेमाचे डेन्मार्कसारख्या देशात संपन्न झालेल्या चित्रपट महोत्सवासाठी निवड केली जाणे ही कोणत्याही मराठी मनासाठी अभिमानास्पद बाब आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी उमेश कुलकर्णीना खास आमंत्रित करण्यात आले होते. या आमंत्रणाला मान देत उमेश कुलकर्णी डेन्मार्क इंडियन चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहिले. डेन्मार्कसारख्या ठिकाणी एखाद्या मराठी सिनेमाची निवड होणे किंवा त्याहीपेक्षा रसिकांनी कौल दिलेल्या 'देऊळ' सिनेमाची निवड होणे ही या सिनेमाला आंतरराष्ट्रीय पातळीवर खर्‍या अर्थाने मिळालेली दाद आहे. उमेश कुलकर्णीच्या 'वळू' आणि 'विहीर'ने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला होताच, पण 'देऊळ'ने मराठीची पताका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर फडकवण्याचे कार्य केले आहे. यामुळे भविष्यात मराठी सिनेमाचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील मार्ग खूप सुखकर झाला असून मराठी सिनेमांच्या कक्षा आणखी रुंदावणार आहेत. डेन्मार्कमध्ये दाखवला गेलेला 'देऊळ' हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांसोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रेक्षकांनीही 'देऊळ'ला पसंती दर्शवल्याने अधिक चांगले काम करण्यासाठी उत्साह वाढल्याची भावना उमेश कुलकर्णीनी व्यक्त केली आहे. भारतामध्ये प्रदर्शित झालेल्या 'देऊळ'ने अबुधाबी, रॉटरडॅम, न्यूयॉर्क आणि जर्मनीसारख्या देशांतील प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले. नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, ज्योती सुभाष, अतिषा नाईक, किशोर कदम, उषा नाडकर्णी, हृषिकेश जोशी, शशांक शेंडे, मोहन आगाशे, विभावरी देशपांडे आदी कलाकारांच्या बहारदार अभिनयाने या सिनेमातील प्रत्येक पात्र सजीव केले. नसिरुद्धीन शाह यांनी या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच मराठी भाषेचा गोडावा चाखला आणि त्यासोबत नाना पाटेकरांसारख्या आपल्या समकालीन कलाकारासोबत काम करण्याचे त्यांचे स्वप्नही साकार झाले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA