हिंदी चित्रपट रिवायत
'सत्यमेव जयते' या कार्यक्रमातून देशभर जनजागृती केली. स्त्री बचाव मोहीम आता बळकट होत असून या मोहिमेला वेगवेगळय़ा पद्धतीने समाजासमोर मांडले जात आहे.आगामी प्रदर्शित होत असलेल्या 'रिवायत' या हिंदी चित्रपटातून याच गोष्टीवर प्रकाशझोत टाकून जनजागृती केली आहे. मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय पाटकर याचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभलेले असून या चित्रपटात त्याचा आपणास अभिनय देखील पाहावयास मिळेल.विजय पाटकर याच्या रूपाने हिंदी चित्रपट सृष्टीला अजून एक मराठी दिग्दर्शक मिळाला आहे. 'रिवायत' याचा अर्थ कहानी अथवा केस हिस्ट्री, असा होतो. वेगवेगळय़ा देशांतील चित्रपट महोत्सवात तब्बल 5 अंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेता व 12 नामांकने मिळवलेला 'रिवायत'या चित्रपटाचे कॅमेरामन सुरेश सुवर्णा हे असून कला दिग्दर्शक युनूस पठाण तर संकलन दिनेश मेंगडे यांनी केले. या चित्रपटात आपणास सम्पिका, खलिल सिद्दिकी, सलिल अंकोला, अंचित कौर, सौरभ दुबे, आदित्य लाखिया, नरेंद्र झा, राजेंद्र गुप्ता, मंगल केंकरे, गौरी कुलकर्णी, मेजर विक्रम, राखी मिश्र, तान्या तिवारी व सयाजी शिंदे हे कलाकार असून सहकलाकार कम्मल अदीब, जयवंत वाडकर, जयराज नायर, मिलिंद जोशी, अल्पा जोशी व मिलिंद यशोद यांचा अभिनय आपणास पाहावयास मिळेल. येत्या 7 सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होत आहे, असे याचे निर्माते व दिग्दर्शक यांनी सांगितले.
Comments