वैशाली माडे चा नवे एलबम्स

 वैशाली माडे हिच्या आवाजातल्या रचनांची मेजवानी असलेल्या युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या 'सुकून' आणि 'कृष्णे वेधिले' या दोन नव्या अल्बमचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की तसेच नामवंत संतूरवादक पं. उल्हास बापट यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. याप्रसंगी युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपचे मंदार गुप्ते, राजन प्रभू, संकल्पनाकार उदय दिवाणे, संगीतकार भगवंत नार्वेकर, गायिका वैशाली माडे आदी मान्यवर उपस्थित होते.



'कृष्णे वेधिले' या अल्मबमध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत

मीराबाई, समर्थ रामदास स्वामी, संत एकनाथ यांच्या मिळून एकू ण नऊ रचना वैशाली माडेने स्वरबद्ध केल्या असून त्यांना भगवंत नार्वेकर यांनी संगीत दिले आहे. महाराष्ट्र ही संतांच्या वास्तव्याने पावन झालेली पवित्र भूमी आहे. तमाम संत-महंतांनी जनसामान्यांच्या मनातील ईश्वरचरणाची आर्त हाक आपल्या विविध अभंगातून शब्दबद्ध केली आहे. हे अक्षरलेणं सर्वाच्या कानावर पडावं, संतसाहित्याचा अनमोल ठेवा निवडक अभंगांना संगीतबद्ध करून स्वर आणि सुरांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याच्या स्वच्छ तसेच निर्मळ भावनेने 'कृष्णे वेधिले' या अल्बमची निर्मिती झाली आहे. वैशालीने स्वरबद्ध केलेला यातला दुसरा अल्बम हिंदी रचनांचा असून त्याचे शीर्षक 'सुकून' असे आहे. या अल्बमची निर्मिती झी टीव्हीने केली असून वितरण युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप करत आहे. 'सुकून' या अल्बममध्ये एकूण सहा रसाळ प्रेमगीते असून ती आघाडीचे संगीतकार आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केली आहेत. वैशाली माडे हिच्याच आवाजात असलेल्या सुकून या अल्बममध्ये एकूण सहा गाणी आहेत. त्यातील दोन गीतांसाठी संगीतकार आदेश श्रीवास्तव यांनी वैशालीला मेल व्हॉईससाठी साथ केली आहे. या अल्बममधील गीते पंची जालोन्वी, श्यामराज यांनी लिहिली आहेत तर संगीत संयोजन अमर मकवाना यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर