सुप्रसिद्ध लेखक अशोक पाटोळे हैलो पप्पा च्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात
दत्ता डावजेकर फिल्मसच्या बैनर खाली आय वॉन्ट टू से हैलो पप्पा ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध संगीतकार दत्ता डावजेकर ह्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव विनय डावजेकर यांनी नाटककार व चित्रपट लेखक अशोक पाटोळे यांच्या सहकार्याने ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
श्यामची आई, आई रिटायर होते ही गाजलेली नाटके, श्रीमान श्रीमती, हसरते, कैम्पस या सारख्या हिट झालेल्या मालिका, आत्मविश्वास, शेजारी शेजारी, चौकट राजा, माझा छकुला या सारख्या मराठी चित्रपटाचे लेखक अशोक पाटोळे प्रथमच दिग्दर्शनात उतरले आहेत.
हैलो पप्पा या चित्रपटाची कथा रुपेश पाटोळे यांची असूऩ पटकथा, संवाद तसेच गीत रचना अशोक पाटोळे यांची आहे. हैलो पप्पा ची कथा एका सात-आठ वर्षाच्या चिमुरडीवर आधारित आहे. हैलो पप्पा मधील कलाकार आहेत किशोर शहाणे, तेजा देवकर, निनाद कामत, कस्तुरी सारंग, शांता तांबे, नुतन जयंत व बाल कलाकार शमिका कदम.

Comments