अनोळखी हे घर माझे च्या ध्वनीफितीचा शानदार प्रकाशन सोहळा

मराठी चित्रपटांच्या विषयांची, विविध कथा कल्पनांची व्याप्ती वाढत असली तरी कुटुंबव्यवस्था, त्याशी निगडीत नातेसंबंध यावर आधारलेल्या चित्रपटांची संख्या खूप मोठी आहे. कौटुंबिकपटांकडे मराठी प्रेक्षकांचा असलेला कल ध्यानात घेता त्यांना मिळणारे यश अपेक्षित आहे. अशाच वेगळ्या कौंटुंबिक कथेवर नोमेड फिल्म्स आणि अक्षर फिल्म्स या निर्मिती संस्थांनी एकत्र येऊन आकारास आलेला अनोळखी हे घर माझे हा कौंटुंबिक मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. जुनेद मेनन-शेखर मोरे यांची निर्मिती असलेल्या अनोळथी हे घर माझे या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन देव यांनी केले आहे.
अशोक सराफ, तुषार दळवी, कविता लाड, पुष्कर श्रोत्री, मेघना वैद्य, सुशांत शेलार, उदय टिकेकर या लोकप्रिय कलाकारांसोबत शितल मौलिक, सुप्रिया पाठारे, तृष्णा बेलंतगडी, उमेश मिटकरी या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. गीतकार प्रवीण दवणे, गुरु ठाकुर यांच्या भावगर्भ गीतांना आशिष रेगो - के सी लॉय यांनी दिलेले बहारदार संगीत आगामी अनोळखी हे घर माझे चे आकर्षण ठरणार आहे.
अनोळखी हे घर माझे च्या श्रवणीय गीतांच्या ध्वनीफितीचा प्रकाशन सोहळा हिंदीतील लोकप्रिय रितेश देशमुख यांच्या हस्ते वांद्रे येथील हॉटेल ताज लैंड्स एन्ड येथे नुकताच संपन्न झाला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता सचिन पिळगांवकर, माजी नगरपाल श्री किरण शांताराम तसेच चित्रपटाच्या तंत्रज्ञ व कलावंतांसोबत हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA