कॉमेडी चित्रपट धावाधाव

दर्जेदार मनोरंजक चित्रकृती निर्माण करण्याच्या ध्यासाने रोहिणी फिल्म्स बैनरखाली निर्माता नारायण भांडारकर धावाधाव का एक धमाल कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेला लोकप्रिय अभिनेता भरत जाधव, शंशाक उदापूरकरच्या जोडीने या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. भरत गायकवाड यांचे दिग्दर्शन असलेल्या धावाधाव चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच नागपूर आणि रामटेक परिसरात पूर्ण झाले आहे. धावाधाव चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता शशांक उदापूरकर यांची लेखक म्हणून नवी ओळख चित्रपटसृष्टीला होत आहे. या धमाल चित्रपटाची उत्कंठा वाढवणारी कथा शंशाक उदापूरकर यांची असून पटकथा-संवाद ही त्यांनीच लिहीले आहेत. या चित्रपटात शशांक उदापूरकरने दुहेरी भूमिका साकारली असून भरत जाधव सुद्धा आगळ्यावेगऴ्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा जय-वीरू व डॉन या धमाल व्यक्तिरेखाभोवती गुंफण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीचा सूड घेण्यापेक्षा व्यक्तिमधील सूड घेण्याची भावना बदलून टाका. अशी या चित्रपटाची संकल्पना आहे. या चित्रपटात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि त्यातील लोकप्रिय ठरलेले प्रसंग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटासाठी गीतकार प्रविण दवणे यानी लिहिलेल्या प्रसंगानुरूप गीतांना ज्येष्ट संगीतकार नंदू होनप यानी संगीत दिले आहे. तर सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, सुदेश भोसले, स्वप्नील बांदोडकर, राहुल वैद्य, वैशाली सामंत यांच्या सुरेल आवाजात ती स्वरबद्ध केली आहेत. धावाधाव या विनोदी चित्रपटाचे छायाचित्रण रंजन झा यांनी केले आहे.
भरत जाधव आणि शशांक उदापूरकर सोबत मोहन जोशी, स्मिता जयकर, आनंद अभ्यंकर, जयवंत वाडकर, अरुण कदम, जयराज नायर, माधवी निमकर, ऋतुजा पाटील, विलास उजवणे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ७७ वेगवेगळ्या लोकेशनवर चित्रीत झालेल्या या चित्रपटासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक निखऴ करमणूकप्रधान चित्रपट पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. धावाधाव या हटके शीर्षकाप्रमाणेच चित्रपटाचे वेगवान कथानक प्रेक्षकांना बांधून ठेवेल असे चित्रीत करण्यात आले आहे. अनेक लोकप्रिय कलाकारांना घेऊन येत असलेला धावाधाव हा कॉमेडी चित्रपट नक्कीच मनोरंजक असेल यात शंका नाही.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर