टोपी घाला रे चे चित्रीकरण अंतिम टप्यात
धार्मिक, कौटुंबिक, सामाजिक, एतिहासिक, विनोदी अशा वैविध्यपूर्ण प्रकारात दर्जेदार निर्मिती सातत्याने होत असताना मराठी चित्रपटातील कथानक, शीर्षकातही नाविन्य पहायला मिऴत आहे. निर्माते सुभाष जाधव, अतुल राजकुऴे, सौ. सुजाता महेंद्र सावंत आणि विनोद घोडावत टोपी घाला रे हा असाच अनोख्या कथानकाचा आणि शीर्षकाचा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीत या चित्रपटाच्या शेवटच्या चित्रीकरण सत्रास सुरुवात झाली आहे. या विनोदी चित्रपटाचे दिग्दर्शन उमेश नामजोशी करीत आहेत.श्री विजयालक्ष्मी प्रोडक्शन आणि मनाली प्रोडक्शन यांची एकत्रित निर्मिती असेल्या टोपी घाला रे या चित्रपटात अरूण नलावडे, निर्मिती सावंत, स्मिता तळवळकर, प्रिया बेर्डे, मंगेश देसाई यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Comments