तुक्या तुकविला नाग्या नाचविला चे चित्रीकरण सुरु
मानिनी, दोघात तिसरा आता सगऴं विसरा, बाप रे बाप डोक्याला ताप सारख्या यशस्वी चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर कांचन अधिकारी तुक्या तुकविला नाग्या नाचविला हा धमाल मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. कांचन अधिकारी यांचा हा नवीन चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करणारा असून मकरंद अनासपुरे-पुष्कर जोग ही जोडी या कॉमेडी चित्रपटाच्या भन्नाट कथेने समस्त प्रेक्षक वर्गाला दिलखुलास हसवेल यात शंका नाही. कैलाशनाथ क्रिएशन्य निर्मित तुक्या तुकविला नाग्या नाचविला चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पालघर परिसरात सुरु झाले आहे.गोदावत इंडस्ट्रीज प्रा.लि. प्रस्तुत या चित्रपटाची करमणूक प्रधान कथा कांचन अधिकारी यांनी लिहिली असून पटकथा - संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत. चित्रपटाची कथा एकाच घरात राहणा-या दोन भिन्न स्वभावाच्या माणसांवर आधारलेली आहे. काका पोलिस खात्यात हवालदार आणि पुतण्या समाजसेवक. काका पोलिस खात्याचा वापर करून लाच घेतो आणि पुतण्या माहितीच्या अधिकाराचा वापर करुन लोकांना मदत करतो, उपोषणाला बसतो. दोघांचा टोकाचा स्वभाव चित्रपटात विनोद निर्मिती करतो।
तुक्याच्या भूमिकेत मकरंद अनासपुरे तर नाग्याची भूमिका पुष्कर जोग ने केली आहे. त्यांच्या सोबत मोहन जोशी, शिल्पा अनासपुरे, मानसी नाईक, सिद्धार्थ, क्रांती रेडकर आदि कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
Comments