चित्रपट मन्या सज्जना
सत्यदेवता चित्र च्या बैनरखाली निर्माते विकास पाटील व भास्कर जाधव निर्मित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित मन्या सज्जना हा धमाल विनोदी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आजचा आघाडीचा विनोदवीर मकरंद अनासपुरे यांच्या दोन विरोधी टोकाची दणदणीत दुहेरी भूमिका हे या चित्रपटाचे वैशिष्टय आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद सुप्रसिद्ध नाटककार व पटकथाकार अभिराम भडकमकर यांची आहे. दिग्दर्शक मिलिंद लेले यांनी या आधी दिवसें दिवस आणि करायला गेलो एक या दोन चित्रपटांची निर्मिती केली आहे. चित्रपटात मकरंद बरोबरच मोहन जोशी, स्मिता शेवाळे, आदिती भागवत, विजय गोखले, शरद पोंक्षे, संतोष जुवेकर, किशोरी अंबिये व इतर आहेत.
Comments