चित्रपट अंकगणित आनंदाचं
आपल्याकडे आईविषयी प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. तशी वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची परंपरा मात्र रूजलेली नाही. वडिलांनीही मुलीबद्दल वा मुलाबद्दल फार हळव्या भावनांच प्रदर्शन करायचं नाही, असा जणू संकेतच काल-परवापर्यंत तरी रूढ होता. पण हे संकेत आता बदलायता लागते आहेत. अंकगणित आनंदाचं या आगामी कौंटुबिक मराठी चित्रपटात वडिल-मुलाच्या नात्यातील भावनिक कंगोरे रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अर्पण गुजर आणि निलेश जोशी यांच्या नाइट अड सुलतान बैनरची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिदर्शन निलेश जोशी करीत आहेत.अंकगणित आनंदाचं या चित्रपटाची कथा छोट्या गावातल्या संवेदनशील मनाच्या आनंद नावाच्या तरूणाची आहे. शहरात लग्न करून चांगल्या नोकरीत स्थिरावलेला आनंद केवऴ वडिलांच्या इच्छेखातर गावी परतण्याचा निर्णय घेतो. त्यांच्या या निर्णयाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून जाते, त्याचवेळी गावी वडिलाचं अकस्मात निधन होतं. गणितात तरबेज असलेला आनंद स्वताच्या जीवनातल्या आनंदाच्या अंकगणितात मात्र अपयशी ठरतो. आयुष्यात कमालीची अस्थिरता आलेली असतानाच आनंद आयुष्यात नव्याने चालून आलेली संधी मोठ्या जिद्दीने स्विकारतो आणि आपल्या लहान मुलाच्या सोबत असलेलं नातं अधिकाधिक घट्ट करीत जिद्दीने या प्रतिकुल परिस्थितीवर मात करतो. आयुष्यातील आनंदाचे अनमोल क्षण टिपणारा वडिल-मुलाच्या नात्यावर बेतलेला चित्रपट म्हणजे ... अंकगणित आनंदाचं....
संदीप कुलकर्णी, एश्वर्या नारकर, सुलभा देशपांडे, मास्टर राहुल फाळके, स्मिता ओक, गणेश रेवडेकर, गिरीश जोशी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
संदीप कुलकर्णी, एश्वर्या नारकर, सुलभा देशपांडे, मास्टर राहुल फाळके, स्मिता ओक, गणेश रेवडेकर, गिरीश जोशी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
Comments