जैनटुडे सोशल फाउंडेशन तर्फे व्यसन मुक्तिसाठी दुचाकी
व्यसनमुक्ति दिनानिमित्त, व्यसन मुक्तिला प्रोत्साहन देण्यासाठी जैनटुडे सोशल फाउंडेशन ने लकी ड्रा द्वारे मोफत दुचाकी देण्याची योजना आखली आहे. या द्वारे व्यसन ग्रासितानी कुटुम्बासह कमीत कमी एक वर्षासाठी म्हणजे पुढील व्यसनमुक्ति दिनापर्यंत, ३१ मे २०१० पर्यंत कुठलेही व्यसन, मांसाहार करायचे नाही. एक अर्ज करून त्यावर तेथील नगरसेवक/सरपंच, एक प्रतिष्ठित व्यक्ती व तेथील मेडीकल ऑफिसर यांच्या सहीनिशी स्वतःच्या नाव, पत्ता व फोटोसह अर्ज जैनटुडे सोशल फाउंडेशन ४४ रतन, गुरुराज सोसाइटी, पौड रोड, कोथरुड, पुणे - ४११०३८ या पत्त्यावर १५ जून २००९ पर्यंत पाठवावा. यात स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध, मुलगा, मुलगी कोणीही भाग घेऊ शकतो. ही योजना सर्व गावे, शहरे, राज्य सर्वांसाठी आहे. लकी ड्रा आलेल्या अर्जातुन पुढच्या वर्षी काढुन आणि चौकशी अंती बक्षीस दिले जाइल.
संपर्क - जैनटुडे सोशल फाउंडेशन – 9960400864
संपर्क - जैनटुडे सोशल फाउंडेशन – 9960400864
Comments