बे दुणे साडे चार चे चित्रिकरण अंतिम टप्यात
व्हिडीओ पैलेस चे नानूभाई जयसिंघानिया आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. मनोरंजन विश्वात गेली अनेक वर्ष नानूभाई जयसिंघानी यांनी आपल्या उल्लेखनीय कामाने स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज वर त्यांनी मराठीतील अनेक सुपरहिट चित्रपटांचे डिव्हीडी, व्हिसीडी चे प्रक्षेपणाचे हक्क मिळविले असून ते चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहचविले आहेत. व्हिडीओ पैलेस बैनर खाली आकारास येत असलेल्या त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटांचे नाव आहे ... बे दुणे साडे चार. या धमाल मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते करीत आहेत. मुंबईतील दादासाहेब फालके चित्रनगरीत या चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरु झाले आहे.बे दुणे साडे चार चित्रपटाची कथा अनंत कित्तूरकरच्या आयुष्यात घडते. अनंत तसा सर्वसामान्य, पण त्याने असं एक असामान्य काम केलं आहे. तो एकाच शहरात दोन संसार चालवित आहे. तेही कुणाच्या नकलत... तेही गेली अनेक वर्ष. एका घरात मनोरमा आणि मुलगी रश्मी तक दूस-या घरात अंजली आणि मुलगा राहुल. या दोन संसारात नियतीन एक मोठा योगायोग निर्माण केला आहे. राहुल आणि रश्मीत एका वर्षांच अंतर असलं तरी दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. गेली अनेक वर्ष अनंत ने ही गोष्ट फार हुशारीने सांभाळली आहे. पण एके दिवशी धोडपकर मुळे अनंतची लपवाछपवी उघड होण्याची वेळ येते. अनेक मजेशीर प्रसंगांनी खुलत जाणारी बे दुणे साडे चार या धमाल चित्रपटाची कथा-पटकथा अनिरुद्ध पोतदार व अभय दखणे यांनी लिहिली आहे.गिरीश मोहिते दिग्दर्शित बे दुणे साडे चार चित्रपटात संजय नार्वेकर, मोहन जोशी, सतीश पुळेकर, वंदना गुप्ते, अतुल परचुरे, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, रेशन टिपणीस, मुग्धा शहा, उदय सबऩीस, स्नेहा वाघ, अनंत जोग, मृणाली मयुरेश, संजीवनी जाधव या मराठीतील लोकप्रिय कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. यातील ये इश्क इश्क... हे आयटम सांग रेशम टिपणीस, संजय नार्वेकर आणि चार रशियन नृत्यांगणेवर चित्रीत करण्यात आलं आहे. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेल्या या गीताचा बाज अरेबिक पद्धतीचा आहे. या गाण्याला संगीत देणा-या संगीतकार आनंद मेनन यांनीच हे गाणं निहारिका जोशी सोबत गायलं आहे.बे दुणे साडे चार चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्याच आले असून लवकरच प्रेक्षकांना निखळ करमणूक करणारा धमाल चित्रपट पहायला मिळणार आहे.
Comments