चित्रपट मान सन्मान प्रदर्शनासाटी सज्ज

जगण्याविषयी स्वताच्या स्वतंत्र संकल्पना असलेली आजची पिढी एकत्र कुटुंबातून विभक्त कुटुंबात अधिक रमणाण होताना दिसत आहे. आधुनिकीकरणाच्या आहारी जात कौटुंबिक जबाबदारी विसरलेल्या आजच्या युवा पिढीतील काही जणांना आपल्या जन्मदात्यांचाच विसर पडलेला दिसतो. त्याचवेळी दुसरीकडे सुखासीन आयुष्य जगत असूनही आई-वडिलांच्या मायेला पारखी असलेली पिढी ही पाहायला मिऴत आहे. समाजातील हाच बदलता प्रवाह चित्रपटातून रेखाटण्याचा प्रयत्न आर के व्हिजन बैनरच्या मान सन्मान चित्रपटातून करण्यात आला आहे.
राकेश कुमार मेहेता निर्मित प्रविण राजा कारळे दिग्दर्शित मान सन्मान चित्रपटात समाजातील दुभंगलेल्या कुटुंबसंस्थेमुळे नातेसंबंधामध्ये आलेली पोकळी चित्रित करण्यात आली आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या मान सन्मान चित्रपटात शिवाजी साटम, रिमा लागू, रेशम टिपणीस, यतिन कार्येकर, पंकज विष्णू, अविष्कार दारव्हेकर, मेघा घाटे, आशिष पवार यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
उत्तम कथानक, दमदार स्टारकास्ट असलेला चित्रपट मान सन्मान प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर