Salman Khan स्क्रीनवर किसिंग सीन करत नाही ?
Shankar Marathe, Mumbai - 19 October, 2020 : Salman Khan हा फक्त बॉलीवुडचा सुपरस्टार नसून तो एक चांगलं व्यक्तिमत्त्व आहे. त्याच्या रोमान्स आणि अफेअरच्या च्या बातम्यात लोकांना खूप आवड आहे. त्याने त्याच्या पहिल्या चित्रपटापासून आत्ताचा प्रसिद्ध चित्रपट दबंग-३ या शेवटच्या चित्रपटापर्यंत त्याने त्याच्या कुठल्याही हिरॉईनला कधीही पडद्यावर किस केला नाही.
सलमान खानच्या पहिल्या चित्रपटात भाग्यश्री घाबरली होती की त्या चित्रपटात एक सीन मध्ये सलमान खानला तिला किस करायचा होता. त्यावेळी नुकतेच भाग्यश्रीने तिच्या घरी कोणाला नाही सांगता तिचा प्रियकर हिमालयशी लग्न केले होते. कसा तरी तीला हा चित्रपट पूर्ण करायचा होता. पण जेव्हा तिने सलमान खानचे उत्तर ऐकले तेव्हा तिला आश्चर्य वाटले आणि सलमानच्या बाबतीत तिच्या मनात आदर देखील वाढला.
Salman Khan फोटोग्राफरला सांगत होता की, तिच्या परवानगीशिवाय मी तिला किस करू शकत नाही. सलमान खाननी त्याच्या प्रत्येक गर्लफ्रेंडला खूप मनापासून प्रेम केलं आहे. अस नाही की दिग्दर्शकला त्याचा चित्रपटात किसचा सीन ठेऊ वाटत नाही पण त्याच एक कारण देखील आहे.
काही वर्षांपूर्वी सलमानने एका मासिकाला मुलाखत देताना सांगितले होते की मी पुराणमतवादी नाही, पण मला माहित आहे की संपूर्ण कुटुंब एकत्र माझा चित्रपट पाहतो. खरं तर, जेव्हा सलमान खान आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत डीव्हीडीवर इंग्रजी चित्रपट बघायचा, तेव्हा स्मोकिंग चे दृश्य येताच सगळेजण बाजूला इकडे तिकडे पाहू लागायचे.
वडील आणि आईसमोर अशी दृश्ये पाहिल्यानंतर सलमानला अस्वस्थ वाटायचे. ते एकतर असा सिन आल्यावर तो सीन पूढे घेत असत किंवा रूम मधून बाहेर जात असत. त्याचबरोबर त्याने अस ठरवलं की आपल्या कोणत्याही चित्रपटात असे काहीही केले जाणार नाही की एकत्रितपणे पाहून कुटुंबातील कोणाला लाज वाटेल.
Comments