अंतरंग -- अभिनेत्री निशिगंधा वाड
जन्मतिथि - ११ ऑक्टोबर १९६९
अभिनयाची शिष्यवृत्ती - वयाच्या ११व्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली
चित्रपटांमध्ये पदार्पण - १९९० च्या सुमारास व्यावसायिक चित्रपटांमध्ये त्यांचे पदार्पण केले. गालावरल्या त्या दोन खळ्यांनी कित्येक श्वासांचे लगाम खेचले असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी. भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला. एक सालस, चिकित्सक, अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांनी काही मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर शंभरहूनही अधिक चित्रपट त्यांच्या नावे आले.
गाजलेले मराठी सिनेमे - 'शेजारी-शेजारी', 'वाजवा रे वाजवा', 'एकापेक्षा एक', 'प्रतिकार', 'सासर माहेर', 'अशी ही ज्ञानेश्वरी'
हिंदी चित्रपट - 'सलिम लंगडे पे मत रो', 'कर्म योद्धा', 'दादागिरी', 'आप मुझे अच्छे लगने लगे'
उत्तम लेखिका - 'कुलवधू' (मराठी) व 'झी हॉरर शो' (हिंदी) यांसारख्या मालिकाही त्यांनी केल्या. अभिनयासोबतच एक उत्तम लेखिका म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. निशिगंधा वाड या नेहमीच लिहित असतात व आतापर्यंत त्यांनी ९ पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी लिहीलेल्या ५ पुस्तकांपैकी ३ पुस्तकांना राज्य शासनाचा मानाचा पुरस्कार मिळाला.
तिहेरी डॉक्टरेट - २००३ मध्ये मुंबई विद्यापीठातून 'चेंजिंग रोल ऑफ वुमन इन सोसायटी' या विषयावर पीएचडी केली. यावेळी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून 'महिला सक्षमीकरण' वर दुसरी पीएचडी पूर्ण केली आणि पुण्यातून तिसरी पीएचडी केली
Comments