१५ ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरु होणार...

 शंकर मराठे, मुंबई, १३ ऑक्टोबर : १५ ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल्स उघडण्यात येणार आहे. कंटेनमेंट झोन वगळता इतर भागात ही सिनेमागृहं उघडण्यात येतील. सिनेमागृहांमध्ये केवळ पन्नास टक्के सीट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या नियमाचे पालन करूनच सिनेमा हॉल व मल्टिप्लेक्स उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. दोन सीट्सच्या मधील एक सीट रिकामी ठेवली जाईल, त्याचप्रमाणे मधल्या रिकाम्या असणाऱ्या सीटवर कुणी बसू नये याकरता मार्क करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सॅनिटायझेशन आणि इतर खबरदारी घेत सिनेमा गृहं खुली केली जाणार आहे.

थिएटर मध्ये प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा 'खाली पिली' असणार आहे. खाली पील चित्रपटात इशान खट्टर आणि अनन्या पांडे ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. या सिनेमामध्ये इशान खट्टर टॅक्सीवाल्याच्या भूमिकेत आहे. त्याच्या अपोझिट अनन्या पांडे असणार आहे. अनन्या आणि इशान व्यतिरिक्त या सिनेमामध्ये जयदीप अहलावत देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'पाताल लोक' फेम जयदीप यांनी या सिनेमामध्ये विलनची भूमिका साकारली आहे.


तसे पाहिले तर "खाली पिली" हा सिनेमा याआधी ओटीटी  प्लॅटफॉर्मवर २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. झी प्लेक्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. त्यामुळे हे सांगणे थोडे कठीण आहे की, या सिनेमाची थिएटरमध्ये कमाई कितपत होईल. त्याचप्रमाणे सरकारच्या गाइडलाइननुसार सिनेमागृहातील केवळ पन्नास टक्के सीट्ससाठीच बुकिंग होणार आहे. त्यामुळे हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालेल की आपटेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर