श्रद्धा कपूर बनू शकते का इच्छाधारी नागिन ?
Shankar Marathe, Mumbai - 28 October, 2020 : श्रद्धा कपूर बनू शकते का इच्छाधारी नागिन ? हयाबद्दल सध्या बाॅलीवुडच्या फिल्मी दुनियेत एकदम जोरात चर्चा सुरु झाली आहे. त्याचं असं झालं कि दस-याच्या दिवशी श्रद्धा कपूरचे काही फोटो सोशल मिडियात वायरल झाले होते व ते होते निर्माता निखिल व्दिवेदी यांच्या आॅफिस बाहेरील श्रद्धा कपूर फोटो. काही दिवसापूर्वी निखिल ने इच्छाधारी नागिन रुपेरी पडदयावर उतरविण्याची इच्छा जाहिर केली होती व त्यासाठी बाॅलीवुड मधील टाॅपच्या हीरोईन बरोबर चर्चा देखील सुरु झाली होती.
आता श्रद्धाला त्यांच्या आॅफिस बाहेर पाहिल्यावर तर अजूनच चर्चेला पालवी फुटली आहे व दर्शक तर श्रद्धाची तुलना जुन्या चित्रपटात इच्छाधारी नागिन बनलेल्या श्रीदेवी, रीना राॅय व रेखा सारख्या हीरोईनशी करु लागले आहेत.
Comments