Shankar Marathe, Pune - 16 December, 2020 : पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा आहे, त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उर्वीता प्रॉडक्शन्सच्या वतीने स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या 333 व्या स्मरणदिनी ‘रक्तदान महायज्ञ’ आयोजित करण्यात आला होता. या महायज्ञाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अवघ्या काही तासात 333 बाटल्या रक्तसंकलन झाले अशी माहिती संदीप रघुनाथराव मोहिते पाटील यांनी दिली. कला प्रसाद मंगल कार्यालय, विजयानगर कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित रक्तदान महायज्ञाचे उद्घाटन अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, या चित्रपटाचे निर्माते शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांच्यासह पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, रोहित टिळक,माजी नगरसेवक धिरज घा...