रांगोळीच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव
शंकर मराठे - मुंबई, २ डिसेंबर २०२०:- दिवाळीचे औचित्य साधून शेमारू मराठीबाणा या चित्रपट वाहिनीने रांगोळीकारांना सोबत घेऊन अनोखा व्हर्च्युअल उपक्रम राबवला होता. कलेच्या माध्यमातून गौरव करण्यासाठी महाराष्ट्रातील रांगोळीकार या उपक्रमात सहभागी झाले. या उपक्रमांतर्गत मनोवेधक रांगोळीच्या माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीचा गौरव करण्यात आला त्या सोबतच महाराष्ट्रातील रांगोळीकारांना मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर आपली कला सादर करण्याची संधी शेमारू मराठीबाणा मूळे उपलब्ध झाली. या रांगोळी कलाकारांचे आभार मानण्यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्यात आली आणि त्यांच्या रांगोळ्यांचे फोटो व व्हिडिओ शेमारू मराठीबाणाच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर अपलोड करण्यात आले आहेत.
या अनोख्या उपक्रमाबद्दल लोकप्रिय मराठी सिनेस्टार स्वप्नील जोशी यांनी सांगितले, "शेमारू मराठीबाणा वाहिनीने राबविलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, उत्कृष्ट रांगोळीकारांकडून त्यांच्या कलेच्या माध्यमातून सिनेसृष्टीचा गौरव होणं ही आनंदाची बाब आहे. मराठी सिनेमा आणि नाटकं हे नेहमीच आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिले आहेत तसेच रांगोळी देखील. या उपक्रमातून शेमारू मराठीबाणाने आपल्या नावाला साजेसं असं काम केलं आहे, - आपली मराठी संस्कृती आणि मराठीबाणा जपणाऱ्या या कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे. त्यासाठी या कलाकारांचे आणि वाहिनीचे विशेष कौतुक."
भारतातील सर्व सणांचा अविभाज्य भाग म्हणून रांगोळी हा कलाप्रकार ओळखला जातो. हा भारतीय कला प्रकार अतिशय प्राचीन असून यामध्ये रंगीत तांदूळ, सुके पीठ, रंगीत वाळू किंवा फुलांच्या पाकळ्या यासारख्या पर्यावरणस्नेही पदार्थांचा वापर करून जमिनीवर अतिशय नाजूक नक्षी रेखाटली जाते. दिवाळी, ओणम, पोंगल, संक्रांत आणि इतर अनेक हिंदू सणांना रांगोळी काढण्याच्या परंपर अतिशय लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे स्वअभिव्यक्तीचा कलाप्रकार म्हणून देखील रांगोळीचा वापर केला जातो.
आपल्या नावावर खरं उतरत, मराठी संस्कृती आणि परंपरा दर्शवणारं कन्टेन्ट सादर करून त्याची लोकप्रियता वाढविण्यात ही वाहिनी आघाडीवर आहे. शेमारू मराठीबाणावर विविध शैलीतील मराठी चित्रपट आणि नाटके दाखवली जातात जी इतर कोणत्याही टीव्ही चॅनेलकडून दर्शकांसाठी दाखवली जाणे खूपच दुर्मिळ आहे.
Comments