अक्षय कुमार डाबर च्यवनप्राशचा नवा चेहरा

शंकर मराठे - मुंबई, ११ डिसेंबर २०२०:- भारतातील आघाडीच्या विज्ञान-आधारित आयुर्वेद तज्ज्ञ डाबर इंडिया लिमिटेडने प्रसिद्ध बॉलीवूड स्टार आणि फिटनेस आयकॉन अक्षय कुमारची डाबर च्यवनप्राशचा प्रमुख पूरक नवा चेहरा म्हणून जाहीर केले. फिटनेसफ्रिक असलेल्या अक्षय कुमारच्या ‘स्वास्थपूर्ण जगण्या’च्या जीवनपध्दतीमुळे त्याची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सध्याच्या या अनिश्चित काळामध्ये देशाला एकत्र यावे आणि आंतरिक शक्ती व लढाऊ भावना निर्माण करण्याचे वचन डाबरच्यावतीने यानिमित्ताने देण्यात येत आहे.

सध्याच्या काळात प्रतिकारशक्तीची आवश्यकता आणि त्यापेक्षा जास्त महत्त्व पूर्वीपेक्षा जास्त अधोरेखित झाले आहे. अनेकविध आजारांपासून दूर राहण्यासाठी उत्तम रोगप्रतिकारक शक्ती ही आजची नितांत गरज झाली आहे. अशावेळेस अश्वगंधा, गिलोय आणि आमला या अशा 400 हून अधिक औषधी वनस्पतींच्या सामर्थ्याने डाबर च्यवनप्राश आजारांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कायम उभे राहिले आहेत. देशाच्या आरोग्य सशक्तीकरणात डाबर च्यवनप्राशने नेहमीच पुढाकार घेतला आहे. आरोग्य, तंदुरुस्ती आणि आंतरिक सामर्थ्य या बाबी अक्षय कुमार आणि डाबर च्यवनप्राशमध्ये समान आहेत. त्यामुळे त्यांचे डाबर कुटूंबात सहर्ष स्वागत असल्याचे डाबर इंडिया लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मल्होत्रा म्हणाले.

सध्या सुरु असलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’साठी अक्षय कुमारसोबत आम्ही एकत्र येत ’मेड इन इंडिया, भारतीयांसाठी, भारतीयांसाठी’, आणि प्रत्येक भारतीय घरातील रोगप्रतिकारक शक्ती आणि समृध्दी यांची काळजी घेऊ असेही मल्होत्रा यांनी यावेळी नमूद केले.


यावेळी आशिया पॅसिफिकचे सीईओ आणि सीसीओ मॅककॅन वर्ल्ड ग्रुप, इंडियाचे अध्यक्ष, प्रसून जोशी म्हणाले, अक्षय आणि डाबर च्यवनप्राशन हे आपल्या देशात फिटनेस आयकॉन आहेत. त्यामुळे हे दोघांचे एकत्रित येणे हे अगदीच नैसर्गिक आहे. गेल्या दोन दशकांपासून मी ‘डाबर’सोबत संलग्नीत आहे. त्यामुळे मी हक्काने सांगू शकेन की, हा नवा प्रवास डाबरसाठी एक महान अध्याय असेल आणि अधिकाधिक ग्राहकांशी संबंध दृढ करेल.

प्रत्येक घरात, प्रत्येकाला घ्यावी लागेल एक शपथ, स्वत:ला मजबूत करण्याची. कारण आपण तंदुरुस्त असू, तरच प्रत्येक संकटाला तोंड देऊ शकू, आणि त्यासाठीच मग ‘देशाचा विश्वास, दररोज डाबर च्यवनप्राश’ ही डाबरची प्रतिज्ञा मी घराघरात पोहोचवणार आहे. आणि यानिमित्ताने मी डाबर कुटुंबातील एक भाग होत असल्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि मला आनंद आहे. अस्सल आयुर्वेदाच्या विज्ञानाद्वारे डाबरने देशाचे आरोग्य व तंदुरुस्तीचे सतत पालन पोषण केले. माझा विश्वास आहे की डाबर आणि मी एकत्र, डाबर च्यवनप्राश प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्तीकडे नेऊ म्हणजे एकत्रितपणे आपल्या देशाची प्रतिकारशक्ती अधिक मजबूत होईल आणि आम्ही प्रत्येक आव्हानांवर विजय मिळवू शकतो, असा विश्वास यावेळी अक्षय कुमारने व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर