स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते स्मरणदिनी रक्तदान महायज्ञाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Shankar Marathe, Pune - 16 December, 2020 :  पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा आहे, त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उर्वीता प्रॉडक्शन्सच्या वतीने स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या 333 व्या स्मरणदिनी ‘रक्तदान महायज्ञ’ आयोजित करण्यात आला होता. या महायज्ञाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अवघ्या काही तासात 333 बाटल्या रक्तसंकलन झाले अशी माहिती संदीप रघुनाथराव मोहिते पाटील यांनी दिली.

कला प्रसाद मंगल कार्यालय, विजयानगर कॉलनी, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित रक्तदान महायज्ञाचे उद्घाटन अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, या चित्रपटाचे निर्माते शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांच्यासह पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, रोहित टिळक,माजी नगरसेवक धिरज घाटे, धनंजय जाधव,पोलीस निरीक्षक विशाल मोहिते पाटील, डॉ. रणजीत ढगे पाटील, डॉ. रणजीत निकम, सूरज भिसे, गणेश फणसे, राजेंद्र मोहिते, नीलेश पवार,तुषार भामरे, विरेंद्र मोहिते, गायत्री मोहिते,शलाका मोहिते, संदेश मोहिते, डॉ. शैलेश मोहिते,गणेश मोहिते, सुरेश मोहिते, विक्रमसिंह मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना लेखक, दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणाले "मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात सध्या रक्ताचा तुडवडा असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत ‘सरसेनापती हंबीरराव’चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या 333 व्या स्मरणदिनानिमित्त ‘रक्तदान महायज्ञ’ आयोजित केला, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व रक्तदात्यांचे मी आभार मानतो तसेच पुणेकर व राज्यातील नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी रक्तदान शिबिरात किंवा नजीकच्या रक्तपेढी मध्ये रक्तदान करावे."

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील कलाकार,तंत्रज्ञ यांनीही या प्रसंगी रक्तदान केले यामध्ये रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील अभ्यंकर,सुरेश विश्वकर्मा, केदार सोमण, जयेश संघवी,विशाल चांदणे, सौरभ कर्डे, चेतन चावडा, निनाद सूर्यवंशी, सुनील पालकर, शेखर जावळकर, महेश बराटे, अमोल धावडे, किरण कटके, शैलेश देशमुख, चंद्रकांत भंडारी, सागर पवार, विजय महामुलकर, बाबा ललकारे, वरद संघवी, तुषार कांबळे, राहुल नेवासे, करण राजवीर, अमोल हुलावळे यांचा समावेश होता.

दरम्यान, ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या निर्मात्यांच्या वतीने रक्तदान महायज्ञात सहभागी रक्तदात्यांना या चित्रपटाच्या आगाऊ तिकीटाची कृतज्ञापूर्वक भेट देण्यात आली. तर याप्रसंगी मानसिंग मोहिते पाटील यांनी पहिले तिकीट विकत घेतले. या रक्तदान महायज्ञाला प्रादेशिक रक्त पेढी, ससून रुग्णालय यांचे विशेष सहकार्य लाभले अशी माहिती  संदीप रघुनाथराव मोहिते पाटील यांनी दिली. 


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर