पीआर, कम्युनिकेशन व जर्नालिजम एमए अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ अपग्रॅड सोबत सुरु करीत आहे
शंकर मराठे - मुंबई, २ डिसेंबर, २०२०:- अपग्रॅड या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन उच्च शिक्षण ब्रँडने भारतातील सर्वात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विद्यापीठांपैकी एक मुंबई विद्यापीठासोबत भागीदारी करत इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषांमधून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पदार्पण केल्याची घोषणा केली आहे आणि अशाप्रकारे अपग्रॅडने पदवी शिक्षण क्षेत्रात आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. पीआर आणि कम्युनिकेशन व जर्नालिजम असे दोन एमए अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ सुरु करत आहे, हे दोन्ही अभ्यासक्रम ऑनलाईन आणि मिश्रित पद्धतीने चालवले जातील व अपग्रॅड द्वारा समर्थित असतील. या अभ्यासक्रमांचे साहित्य इंग्रजीबरोबरीनेच हिंदी व मराठीमध्ये उपलब्ध असेल. मराठी भाषेतून डिजिटल अभ्यासक्रम उपलब्ध करवून देण्याची ही मुंबई विद्यापीठाची पहिलीच वेळ आहे. यामध्ये रोजगार, स्वयंरोजगार आणि स्पर्धापरीक्षा यांचा समावेश आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या नेमक्या आवश्यकतांनुसार त्यांना सर्वाधिक अनुकूल अशा शिक्षण ट्रॅकमध्ये प्रवेश घेता येईल. अशाप्रकारे 'सर्वांसाठी एकाच पद्धतीचे' शिक्षण ही चाकोरी मोडता येऊ शकेल. या अभ्यासक्रमांमध्ये शंका व प्रश्नांचे निरसन करण्यासाठी प्रत्यक्ष सेशन्स, चर्चा मंच, करिअरबाबत मार्गदर्शन आणि दर आठवड्याला १५ तासांची थेट व रेकॉर्डेड लेक्चर्स असतील जी उद्योगक्षेत्रातील दिग्गज आणि विद्यापीठाच्या शिक्षकांकडून दिली जातील.
अपग्रॅडचे सह-संस्थापक श्री. फाल्गुन कोमपल्ली यांनी सांगितले, ''अपग्रॅडने मुंबई विद्यापीठासोबत धोरणात्मक भागीदारी करून जागतिक दर्जाचा शिक्षण अनुभव निर्माण करण्याचा संकल्प केला आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रातील दिगज्जांचे मार्गदर्शन मिळू शकेल, प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षण व इतर विद्यार्थ्यांसोबत ऑनलाईन नेटवर्क निर्माण करण्याची संधी आणि असे इतर अनेक लाभ मिळू शकतील. निष्कर्षांवर भर देणारा शिक्षण अनुभव मिळवून देणे हा आमचा उद्देश आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी अपग्रॅड सॉफ्ट स्किल्स व योग्यतांचे शिक्षण देते, यामध्ये मुलाखतींसाठी तयारी, रिज्युमे तयार करणे, दर महिन्याला ५००० पेक्षा जास्त रिक्त जागांसह जॉब पोर्टल्स, उद्योगक्षेत्रातील दिगज्जांकडून करिअरबाबत व्यक्तिगत सल्ला, अपग्रॅडच्या एन्टरप्रिन्युअरशिपमध्ये मोफत प्रवेश आणि भारत सरकारच्या स्टार्ट अप इंडिया लर्निंग प्रोग्रामकडून प्रमाणपत्र मिळवण्याची संधी यांचा समावेश आहे."
अपग्रॅडचे भारतातील सीईओ श्री. अर्जुन मोहन यांनी सांगितले, "ईलर्निंग मॉडेलशी जोडल्या गेलेल्या जुन्या शैक्षणिक रूढी मोडीत काढून सर्वांना किफायतशीर आणि लवचिक पद्धतीने नामांकित पदव्या उपलब्ध करवून देणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. मुंबई विद्यापीठासोबत धोरणात्मक भागीदारी करून युवा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन,अद्ययावत अभ्यासक्रम आणि तत्पर, वेगवान प्लेसमेंट सुविधा उपलब्ध करवून द्यावी आणि २०३५ पर्यंत देशातील महाविद्यालये आणि विद्यापीठातील प्रवेशाचे प्रमाण दुपटीने वाढावे ही सरकारची मोहीम पूर्ण करण्यात योगदान द्यावे हा आमचा उद्देश आहे."
मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद (नॅक) कडून पंचतारांकित दर्जा देण्यात आला आहे आणि भारत सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ २०२०) नुसार भारतातील आघाडीच्या २५ विद्यापीठांमध्ये याचा समावेश होतो. मुंबई विद्यापीठाचे आशिया खंडातील स्थान १७७ वे असून दरवर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार मुंबई विद्यापीठ हे जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठांमध्ये गणले जाते. पत्रकारिता आणि पीआर व कम्युनिकेशन्स या दोन्ही विषयातील एमए अभ्यासक्रमांना महाराष्ट्राच्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागातून खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. या अभ्यासक्रमांमध्ये अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पहिली बॅच ३१ डिसेंबर रोजी सुरु होणार आहे.
अधिक माहिती संपर्क साधावा - https://programs.upgrad.com/m.a.-from-mumbai-university.
Comments