हिंदी चित्रपट ‘मरुधर एक्सप्रेस’ चा पोस्टर आणि ट्रेलर लांच झाला
रेविंग्स इ डी यू प्राइवेट लिमिटेड चे राज कुशवाहा आणि दिग्दर्शक विशाल मिश्रा ने चित्रपट ‘मरुधर एक्सप्रेस’ चे पोस्टर आणि ट्रेलर लांच करण्यासाठी सिनेमातील कलाकार आणि क्रू ला अंधेरी येथील द व्यू सिनेमा मध्ये आमंत्रित केले होते. तारा अलीशा बेरी, साउथ एक्ट्रेस प्रिया सिंग, विवान शाह, संगीतकार जीत गांगुली, सिंगर यासिर, आकांशा शर्मा आणि अशीष कौर खास करुन ह्या लांच साठी आले होते. चित्रपटांचे संपूर्ण चित्रिकरण कानपूर मध्ये करण्यात आले आहे. कुणाल रॉय कपूर लांच साठी येऊ शकले नाही, कारण ते शूटिंग करत होते. ज़ी म्यूजिक कंपनी ने म्यूजिक रिलीज केले आहे. अथर्वा मोशन पिक्चर्स चे प्रमोद गोरे चित्रपटांचे सह निर्माता आहेत आणि हा चित्रपट १२ एप्रिल रोजी रिलीज़ होणार आहे.
Comments