Raja Mayekar यांना आदरपूर्वक श्रद्धांजलि

राजा मयेकरकाका गेल्याची बातमी समजली आणि शाहीर साबळे पार्टीतला आणखीन एक हरहुन्नरी विनोदी कलावंत गेला याच प्रचंड दु:ख झाल..मागील काही वर्षांपासुन मयेकर काकांची गाठभेट झाली नव्हती पण आज बातमी समजल्या नंतर त्यांच्या कीत्येक आठवणी उफाळुन आल्या..लालबागच्या कामगार रंगभुमीशी नीगडीत असणारा हा कीडकीडीत शरीरयष्टीचा कोकणातला कलावंत माझ्या वडीलांच्या संपर्कात आला आणि अल्पावधीतच संपुर्ण महाराष्टभर " राजा-क्रुष्णाची जोडी " प्रसिध्दीस आली..अंगविक्षेप न करता एकाही शब्दाने कमरेखालचे विनोद न करताही " विनोदवीर राजा मयेकर " हि उपाधी त्यांना रसिकांनी बहाल केली...बापाचा बाप, नशीब फुकट सांधून घ्या, यमराज्यात एक रात्र, अबुरावाच लगीन, मीच तो बादशहा, आंधळं दळंतयं अशा कीत्येक प्रहसन आणि मुक्तनाट्यांमधून मयेकरकाकांनी आपला दर्जेदार विनोदी अभिनय बाबांसह सादर केला होता.." यमराज्यात एकरात्र " हे मुक्तनाट्य तर मास्टरपीस होत त्यात विवीधरंगी भुमीकेत काकांना पाहाण हा नीव्वळ आनंद होता..आपली कीडकीडीत शरीरयष्टी दाखवत रेड्यावरुन त्यांनी केलेली एन्ट्री हा प्रकार लाजवाबच होता...वयक्तीक आयुष्यातही ते अत्यंत हजरजबाबी होते..घरी येत तेंव्हा एक क्षणभरही कधी शांत बसत नसत.." बघ मी अजुन हिरो सारखा दिसतो की नाही ? " हा त्यांचा प्रश्न ठरलेला असायचा...ते कधीच म्हातारे होणार नाहीत याचा त्यांना आणि आम्हालाही विश्वास वाटत असे पण शेवटी म्हातारपणात त्यांचा म्रुत्यु व्हावा हे खरच दु:खदायक आहे पण तरीही मनाने कायम तरुण राहीलेल्या राजा मयेकरकाकांना आदरपुर्वक श्रध्दांजली.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर