पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर हिंदी - मराठी चित्रपट!
विविध भाषांमध्ये इतिहासातील विशाल कर्तृत्ववान व्यक्तींवर अनेक आशयसंपन्न चित्रपट निर्माण होत आहेत. प्रेक्षकांकडून या चित्रपटांना उत्स्फुर्त प्रतिसादही मिळत आहे. आपल्या राज्यकारभार आणि न्यायदानात निष्णात असलेल्या इतिहासातील महान कर्तृत्ववान तेजपुंज राणी म्हणजेच "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर". त्यांचा इतिहास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यातून आजच्या तरुण पिढीला बरेचकाही शिकता येण्यासारखे आहे. इतिहासातील सर्वगुणसंपन्न पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर "पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स" द्वारे निर्माते बाळासाहेब कर्णवर पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" या हिंदी आणि मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. नुकतीच या चित्रपटाचे पोश्टर लॉंच करून घोषणा करण्यात आली.
Comments