जतिन गुप्ताच्या बेस्ट सेलर "कलयुग" वर बनु शकतो बॉलीवुड चित्रपट

आपणास खरोखरच बेस्टसेलर्स मध्ये जागा बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात रिलीज करण्याची आवश्यकता नाही आहे! जर ते एक मोहक आणि आश्चर्यकारक पुस्तक असेल तर ते आपल्या क्षमतेने वाचकांपर्यंत पोहोचेल! हे कारण आहे कि कोणीही सध्याचे आगामी लेखक लोकप्रिय ‘कलियुग: द असेंशन’ या पुस्तकाचे लेखक जतिन गुप्ता यांच्याकडून शिकू शकता. लेखक जतीन गुप्ता आपल्या अलीकडील फिक्शनवर आधारित पुस्तकाच्या यशाबद्दल अत्यंत उत्सुक आहेत. तथापि,  त्यांनी नॉन-फिक्शन ते फिक्शनकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.

मेगा लॉन्च इवेंट केला नाही, तरी हे पुस्तक हॉट केकसारखे विकले जात आहे. तुम्हाला असा प्रतिसाद अपेक्षित होता? ह्या प्रश्नांवर जतिन गुप्ता म्हणाले, "आम्ही कलियुगच्या २५०० प्रति एका महिन्यात विकल्या आणि ही आमच्यासाठी मोठी बाब होती. ते देखील सरत्या वर्षाच्या अखेरीस हे पुस्तक स्टॉल वर आले, त्यावेळी तर अधिकांश लोक सुट्टीच्या मूड मध्ये परिवारांसोबत व्यस्त असतात, ह्या पुस्तकाने रिकॉर्ड बनिवला. असा प्रतिसाद अपेक्षित होता? खरं सांगायचं तर, जेव्हा मी ही कथा विकसित करीत होतो, तेव्हा पुस्तक असे निघाले कि मी पहिले कधी वाचलेच नव्हते आणि जेव्हा मी प्रत्येक वेळी हे वाचलं, तेव्हा मला वाटलं की आमच्या हातात काहीतरी विशेष आहे.

पुस्तकाच्या मोशन पोस्टरला देखील जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. हे कसे झाले? ह्याबद्दल जतिन गुप्ता ने सांगितले "आम्ही पुस्तकाला वेगळ्या प्रकारे पहात होते आणि ते प्रकाशन प्रक्रियेत असताना आम्ही पुस्तकाच्या बर्यातच पात्रांना आणि दृश्यांना वेगळं रुप देण्याचा धाडसी निर्णय घेतला. आम्ही रेखचित्रें वापरली आणि त्यांना ८ मोशन पोस्टर आणि ट्रेलरमध्ये रूपांतरित केले. विशेष म्हणजे विजुअल्सने शानदार प्रभाव निर्माण केला, ज्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्राम वर २ मिलियनहून जास्त व्यूज, 2500 शेअर आणि 25,000 प्रतिसाद मिळाला."

कलियुग या पुस्तकाबद्दल जतिन गुप्ता म्हणाले की नावानेच माहित पडते कि हे पुस्तक कलियुग बद्दल आहे. कलियुग आपल्यासाठी काय आहे आणि ते कसे होईल, यावर एक कल्पना आहे. इतर बर्याेच कथांप्रमाणे ही कथा अजिबात पौराणिक नाही, तर ह्यामध्ये फैंटेसी देखील आहे आणि पौराणिक कथेत फार कमी घटक आहेत. "

नॉन-फिक्शनसह लेखक म्हणून पदार्पण करण्यापासून अलीकडील फिक्शन रिलीजपर्यंत, त्यांच्या लेखनात काय फरक होता?  ह्यावर जतिन गुप्ता सांगतात, "सेल्फ हेल्प आणि मैनेजमेंट बुक्स वास्तविकता वर आधारित असतात आणि ह्यामध्ये कांसेप्टच्या आजूबाजूला खेळायला फारसा वाव नाही. फिक्शन बाबतीत तसे नसले, तरी ते एक अनंत कॅनव्हास आहे, जिथे आपली कल्पनाशक्ती मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकते. व्यक्तिगत रूपाने, मला काल्पनिक लिखाण आवडते, कारण मी खरोखरच माझ्या मनात जग निर्माण करू शकतो, तेव्हाच मला कळले की मी सहज शैली बदलू शकतो आणि ती माझ्या व्यावसायिक पार्श्वभूमीमुळे असू शकते."

सध्या जतिन गुप्ता GVC नावाच्या ग्लोबल गेमिंग कंपनीत कार्यरत आहेत. याआधी ते इनवेसको नावाच्या एसेट मैनेजमेंट कंपनीत काम करत होते, त्यांच्या व्यावसायिक जीवनाचा एक प्रमुख भाग मैनेजमेंट कंसल्टिंग आणि मार्केटिंग क्षेत्रात गेला आहे.

म्हटले जाते कि हे पुस्तक एखाद्या चित्रपटासाठी परिपूर्ण साहित्य आहे, जतीन गुप्ता यांची इच्छा आहे कि ज्याप्रकारे पुस्तक मोठ्या प्रमाणात लिहिले गेले आहे, त्याचप्रकारे कथेला न्याय देण्यासाठी देखील मोठ्या स्तरावर सिनेमा बनविला पाहिजे.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर