कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला विराट मडके येतोय मोठ्या पडद्यावर
महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतील कुस्ती या खेळाचा थरार राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके ‘केसरी – saffron’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहे. भावना फिल्म्स एल एल पी आणि पुणे फिल्म कंपनी प्रस्तुत या चित्रपटातून विराट मडके हा नवा चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून तो मुळचा कुस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरचा आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विराटने पहिलवानाची भूमिका साकारण्यासाठी थेट खरा आखाडा गाठला आणि ‘हिंद केसरी’, ‘महान भारत केसरी’ रोहित पटेल व ‘महाराष्ट्र केसरी’, ‘रुस्तूम – ए – हिंद’ किताब पटकावलेल्या अमोल बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली कसरतीला सुरुवात केली.
Comments