रेड एफएम सिनेबाह्य कलाकारांना पाठिंबा देण्यासाठी सादर करत आहेत 'रिकी सिंग का व्हीवायआरएल काऊंटडाऊन'
रेड एफएम या भारतातील एका सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक पुरस्कारप्राप्त रेडिओ नेटवर्कने 'रिकी सिंग का व्हीवायआरएल काऊंटडाऊन' हा नवाकोरा शो सादर केला आहे. सिनेबाह्य कलाकारांना पाठिंबा देऊन त्यांच्या संगीताला पुढे आणण्यासाठी खास या शोची निर्मिती करण्यात आली आहे. रेडिओवर सिनेबाह्य संगीताशी सहकार्य करत त्यांना योग्य स्थान मिळवून देण्याचे उद्दिष्ट जपणाऱ्या युनिव्हर्सल म्युझिकशीही त्यांनी सहयोग केला आहे. आरजे ऋषी कपूरच्या या शोमध्ये सिनेबाह्य संगीताची प्रचंड आवड असणाऱ्या 'रिकी सिंग'ची गोष्ट आहे. आरजे ऋषी कपूर यांनी आज मुंबईत सोहो हाऊस येथे रेड एफएमची टीम आणि अनेक ख्यातनाम गायकांच्या उपस्थित हा शो सादर केला.
Comments