‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपटाच्या लेखन - संशोधन प्रमुखपदी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांची निवड!

"पुण्यश्लोक अहिल्यादेवी" या हिंदी चित्रपटाच्या संशोधन आणि लेखन टीमच्या प्रमुखपदी सुप्रसिद्ध लेखक डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. केळे हे संत साहित्याचे आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्राचे मोठे गाढे अभ्यासक आहेत. सध्या ते त्रिपुरा राज्य वीज महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत असून त्यांनी संत साहित्यासोबतच 'अहिल्यादेवी' व 'विद्युत  अभियांत्रिकी' सारख्या विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे.

डॉ. केळे हे बी.ई. (इलेक्ट्रिकल) या विषयाचे पदवीधर असून त्यांनी मार्केटिंगमध्ये एम.बी.ए. केले आहे. तसेच एल.एल.बी., डी.आय.टी., बॅचलर ऑफ जर्नालिझम, ए.सी.पी.डी.एम., एनर्जी ऑडिटर सोबतच पी.एचडी.ही केली आहे. तसेच १९९५ ला प्रकाशित झालेल्या अहिल्यादेवींवरील ग्रंथाचे संपादनही त्यांनी केले आहे. इतर विविध विषयांवरील त्यांची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्यामध्ये 'संतवाणी', 'जगी ऐसा बाप व्हावा', 'शब्दशिल्प' व 'नानी' ही मराठी पुस्तके असून त्यांच्या संशोधनावर आधारित दोन इंग्रजी पुस्तकेही त्यांचे नावावर आहेत. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांचे नावावर असून त्यांचा अनेक सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक संस्थांनी सन्मान केला आहे. तसेच त्यांनी इंग्रजी भाषेवर विशेष प्रभुत्व मिळविले आहे. चिपळूण येथील "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" स्मृती प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. "अहिल्या रत्न" या विशेष पुरस्काराने २०१४ साली त्यांना गौरविण्यात आले असून २०१९ मधील तिसऱ्या आदिवासी धनगर मराठी साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांचे  नोकरीनिमित्त इंदूर येथील तीन वर्षाचे वास्तव्य व अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यक्षेत्रातील त्यांचे काम व त्यांच्या अभ्यासू आणि पारदर्शी दृष्टिकोनाचा "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" चित्रपटाला विशेष फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया सदर चित्रपटाचे निर्माते बाळासाहेब कर्णवर पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी दिली.

"पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स" द्वारे निर्माते बाळासाहेब कर्णवर पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले "पुण्यश्लोक अहिल्यादेवी" या हिंदी - मराठी चित्रपटाची निर्मिती करीत असून या चित्रपटाचे  पोस्टर नुकतेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते लॉंच करण्यात आले आहे. २०२१ च्या दिवाळीमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन करण्याचे उद्दिष्ट्ये असून चित्रपटाच्या लेखन आणि संशोधनाचे कामकाज वेगात सुरु करण्यात आले आहे.  लवकरच कलाकार आणि प्रमुख तंत्रज्ञ यांचीही निवड प्रक्रिया सुरु होणार असल्याचे दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर