हिंदी चित्रपट ‘द हंड्रेड बक्स’ चा स्पेशल सेक्स वर्कर्ससाठी शो दाखविला
‘द हंड्रेड बक्स’ चे दिग्दर्शक दुष्यंत सिंग ने सर्वात प्रथम आपला सिनेमा मुंबई मधील सेक्स वर्कर्सला दाखविला आणि त्यांचा आशिर्वाद घेतला. सर्व म्हटले कि सिनेमा फारच धमाकेदार आहे व शुभेच्छा दिल्या आणि सांगितले कि या चित्रपटावरून वाद होण्याचे कोणतेही कारण नाही. ते फारच आनंदीत आहे कि त्यांचे जीवन धमाकेदार पद्धतीने सादर केले. शोच्या वेळी सर्व सेक्स वर्कर्सला सेनेटरी पैड्स देखील वाटण्यात आले. ह्या सिनेमांतील मुख्य अभिनेत्री कविता त्रिपाठी देखील उपस्थित होती. ती म्हणाली की हा माझ्या आयुष्यातील सर्वात भावनिक क्षण आहे. मला आनंद आहे कि मी त्यांच्या वेदना मोठ्या पडद्यावर सादर करु शकले. हा चित्रपट भारतात १०० हून अधिक सिनेमाहॉल मध्ये लागला आहे आणि लोकांना फारच पसंत येत आहे.
Comments