Jai Marathi Bhasha Din....
दर मराठी भाषा दिनाला आमच मराठीप्रेम अगदी उफाळून बाहेर येत..पण एरव्ही आम्ही मुलांना इंग्रजी माध्यमात घालायला मर मर मरतो..जगाच्या स्पर्धेत आपला पाल्य मागे पडू नये अशी आपण त्या मागची भीती व्यक्त करतो मग संधी मीळेल तीथे मुलांच्या इंग्रजीच प्रदर्शन आपण मांडतो..सतत घरात, दारात त्यांच्याशी इंग्रजीतच बोलतो..ती भाषा मुलांना सवयीची व्हावी म्हणुन आपली मराठी भाषा तीच सौंदर्य, तीच्यातले अनेक गोड वळणं, साहीत्य यांना आपणच कस्पटासमान लेखतो पण मराठी भाषा दिन उजाडला की आपलं मराठी प्रेम खळाळुन वहायला लागत..कधीतरी आजुबाजुला नजर फीरवा आणि बघा गुजराती असो पंजाबी असो, तामीळ,तेलगु,मल्याळी असो हे लोक आपल्या मुलांशी घरात सतत आपल्या मात्रुभाषेतच बोलतात त्यांना कधी चींता नसते आपली भाषा नष्ट होण्याची..पण आपल्या मुलांना मात्र आपणच मराठी भाषेपासुन दूर ढकलतोय आणि आपणच म्हणतोय " मराठी भाषा जगणार कशी? " मराठी साहीत्तीक, लोककला, तुकाराम महाराज, ज्ञानोबामाऊली पर्यंत आपण त्यांना नेतच नाही उलट " आमचा बबड्या कींवा बाळी इग्रजी पुस्तकच वाचतात,इग्रजी चित्रपटच पाहाता,इंग्रजी गाणीच ऐकतात " याचा कोण अभिमान वाटत असतो आपल्याला...बदल पुस्तका पासुन सुरु होऊन चुलीपर्यंत कधी पोचले हे आपल्याला समजतही नाही..चला परत चुली पासुन पुस्तका पर्यंत बदल घडवुया..मराठी भाषा तीथुनच सुरु होते याच भान बाळगुया..मराठीला परत सोन्याचे दिवस आणुया..चुकेल व्याकरण, चुकेल र्हस्व दिर्घ पण मराठी भाषा जगेल असे प्रयत्न करुया....#जयमराठीभाषादिन
Comments