टीनएजर मुलाची सेक्शुअल फँटसी ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चा पोस्टर, ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न

अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा शब्द आपण एखाद्या ठिकाणी उच्चारला तर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या नजरा आपल्याकडे नाही वळल्या तरच नवल. याच नावाचा  मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सर्वत्र त्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रायोगिक रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या आलोक राजवाडेचे‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ च्या माध्यमातून मराठी चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण होत आहे. अतिशय हटके नावअसलेल्या ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’चा पोस्टर, ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा मोठ्या दिमाखात मुंबईत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि संपूर्ण टीम उपस्थित होती.

टीनएजर मुलाची सेक्शुअल फँटसी ते खऱ्या प्रेमाचा अर्थ म्हणजे नक्की काय? याचा उलगडा करणारा ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर