संतोष मिजगर या नवख्या कलाकारासोबत केला भाग्यश्रीने अभिनय
मैंने प्यार किया फेम अभिनेत्री राज्यकन्या "भाग्यश्री' हिने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत "संतोष मिजगर' या नवख्या कलाकारासोबत अभिनयाचा विडा उचलला आहे. "मुकम्मल न हुई चाहत' या अल्बमच्या निमित्ताने भाग्यश्री आणि संतोष एकत्रित आले आहेत, काल एका कार्यक्रमात या अल्बमचं अनावरण करण्यात आलं. इंडस्ट्रीमधील, राजकारणातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती, ते दोन कारणासाठी. एक "मुकम्मल न हुई चाहत'च्या स्वागतासाठी आणि दुसरं खूप दिवसांनंतर भाग्यश्री यांनी इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केलं यासाठी. संतोष मिजगर यांच्या कल्पनेतून साकार झालेला अल्बम हा वाहव्वा मिळवणाराच आहे.
"पाटील' या चित्रपटापासून इंडस्ट्रीमध्ये दणकेबाज इंट्री करणारा संतोष मिजगर एका नव्या शाब्बासकीसाठी तयार झाला आहे. "मैंने प्यार किया' चित्रपटाच्या माध्यमातून अवघ्या तरुणाईला भुरळ घालणाऱ्या भाग्यश्रीला घेऊन संतोषने अभिनय केलेला "म्युझिक अल्बम' लॉन्चिंग होण्यापूर्वीच मार्केटला चर्चेचा विषय ठरला होता. काल अंधेरीत अगदी धूमधुडाक्यात या म्युझिक व्हिडिओचं लॉन्चिंग करण्यात आलं. गायक शौर्य मेहता आणि दीपा उदित नारायण या दोघांचा अल्बममधील गाण्यात आवाज आहे. थिएटरमध्ये व्हिडीओचं ट्रेलर सुरू झालं-
मुक्कमल ना हुई चाहत
किसीसे क्या शिकायत है
जुदा करना मोहब्बत की
अपनी पुरानी आदत है
जो हम ना मिल सके ये तो
सितम था वक्त का कोई
ये पल भर का ये मिलना भी
वो रब की ही इनायत है।
ऋषी आझाद यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्याच्या छान ओळी आणि डीएच हार्मोनी, एसआरएम अलीएन यांनी तयार केलेले जबरदस्त संगीत कानावर पडताच थिअटरमध्ये शिट्या आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. या अल्बममध्ये भाग्यश्री आणि संतोष मिजगर यांनी भूमिका केली आहे. एका नवख्या आणि सर्वसामान्य कलाकाराबरोबर भाग्यश्रीने केलेली अदाकारी या वेळी सर्वांच्याच तोंडून चर्चिली जात होती. माजी मंत्री महादेव जानकर यांनी अभिनेता संतोष मिजगर यांचं तोंडभरून कौतुक करत आपण भाग्यश्रीचे चाहते कसे होतो, या सर्व आठवणी भाग्यश्रीच्या समोरच जानकर यांनी जाग्या केल्या. प्रदर्शित झालेल्या "पाटील' या सुपरहिट चित्रपटामुळे मिजगर यांची अवघ्या महाराष्ट्राला ओळख झाली. त्यानंतर संतोष यांनी मागे फिरून पाहिले नाही. हिंदी चित्रपटासह अनेक वेगवेगळे प्रयोग घेऊन तो लोकांच्या भेटीला येऊ लागलाय. त्यातला "मुक्कमला ना हुई चाहत' हा एक छोटासा प्रयोग आहे. ग्रामीण भागातून येऊन एखादा सर्वसामान्य तरुण आपलं वेगळपण सिद्ध करतो आणि त्यातून काहीतरी वेगळं घडतंय, याचं उत्तम उदाहरण म्हणजे संतोष मिजगर. फिल्म इंडस्ट्रीमधील आपल्या अनुभवाच्या जोरावर संतोषने केलेले वेगवेगळे प्रयोग नेहमी चर्चेचे विषय असतात. आता चर्चा अधिक होते, टी-सीरिज आणि भाग्यश्री यांच्या संयुक्त अभिनयाने... प्रयोगशील सादरीकरणामुळे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संतोष मिजगर यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली मंडळी मोठ्या प्रमाणात होती. या अल्बमच्या निमिर्तीसाठी राजेभाऊ फड यांचे विशेष योगदान असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हे गाणे मराठी, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी या भाषेमध्ये येणार आहे. या कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक शिवाजी लोटन-पाटील, गायक शौर्य मेहता, टी-सीरिजचे किशन कुमार, जय मिजगर यांसह इंडस्ट्रीमधली अनेक मंडळी या वेळी उपस्थित होती. एका दिवसामध्ये यू-ट्युबवर या गाण्याने धम्माल केली असून लाखो चाहत्यांनी हे गाण ऐकलं आहे.

Comments