सपना चौधरी, विक्रांत आनंद, ज़ुबेर ख़ान आणि अंजू जाधव ने आपला चित्रपट ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ चा ट्रेलर लांच केला.
सपना चौधरी चा येणारा नविन सिनेमा ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ मध्ये सपना सोबत विक्रांत आनंद, जुबेर खान, अंजू जाधव आहेत. चित्रपटांचे निर्माता आहेत जॉयल डेनियल, तर कथा लिहिली आहे रीना डेनियल ने. सिनेमाला संगीत अल्ताफ सईद व मन्नी वर्मा ने दिले आहे. चित्रपटांचे दिग्दर्शक हदी अली अबरार आहेत. शेयर हैप्पीनेस फिल्म्सच्या बैनर खाली चित्रपटांची निर्मिती केली आहे. दिग्दर्शक हदी अली अबरार ने निर्मात्याला शुभेच्छा दिल्या आणि सांगितले कि ह्या सिनेमात चार मुख्य कलाकार आहेत व सर्वांनी कमालीचे काम केले आहे. जॉयल डेनियल ने आपल्या कास्ट व क्रूला ‘आल द बेस्ट’ म्हटले.
सपना चौधरी..जीने आतापर्यंत हरियाणवी, पंजाबी आणि भोजपुरी मध्ये फारच धम्माल उडवून दिली आहे, आता बॉलीवुड मध्ये धमाकेदार एक्शन करताना दिसणार आहे. जी हां...सपना चौधरीचा बॉलीवुड मूवी ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ ८ फेब्रुवारी रोजी रिलीज़ होणार आहे. म्हणूनच रिलीजच्या अगोदर सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि ह्याला भरपूर लाइक देखील मिळाल्या आहेत. सिनेमा कधी प्रदर्शित होणार आहे हे देखील सांगितले आहे, हा चित्रपट ८ फेब्रुवारी रोजी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. चित्रपटांत चार दोस्तांची कथा आहे... ज्यांचे आप-आपली स्वप्ने आहेत... आणि सर्वजण आपली स्वप्ने वास्तविक जीवनात उतरविण्यासाठी आप-आपला मार्ग निवडतात. सर्वांची स्वतःची एक कथा आहे, परंतु सर्वात खास आहे सपना चौधरी ची भूमिका. कारण ‘दोस्ती के साइड इफेक्ट्स’ मध्ये सपना चौधरी ने पोलिस ऑफिसर ची भूमिका साकार केली आहे आणि जबरदस्त एक्शन करताना दिसणार आहे.
Comments