धडाकेबाज भूमिकेत अशोक समर्थ
बारामती तालुक्यातील एका लहानश्या गावांतील पवार वाडी मध्ये लहानाचा मोठा झालेला कलाकार अशोक समर्थ ने आपल्या अभिनय क्षमतेच्या बळावर बॉलीवुड इंडस्ट्रीत मानाचे स्थान प्राप्त केले आहे. मराठी भाषेत छोटी-मोठी कामे केल्यानंतर अशोक ने हिंदी मध्ये ‘सिंघम’ व ‘सिंभा’ चांगल्या बिगबजट सिनेमातून आपली अभिनय कौशल्य दाखविले आहे व प्रेक्षकांच्या मनात एक मानाचे स्थान मिळविले आहे.
धडाकेबाज डायलॉगबाजी व जबरदस्त अभिनया मुळेच अशोक ने बॉलीवुड फिल्म इंडस्ट्रीत आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. हिंदी भाषेत आता अशोकचा तिसरा चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’ रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. ह्या सिनेमात देखील अशोक ने जबरदस्त रोल साकार केला आहे. हा नवा सिनेमा फेब्रवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
चित्रपट ‘ब्लैकबोर्ड वर्सेज व्हाइटबोर्ड’ मधील आपल्या रोल विषयी बोलताना अशोक सांगतो कि ह्या सिनेमाची कथा गांवातील सरकारी शाळांची जी काही दुरावस्था चालली आहे. तिच सत्यस्थिती दाखविण्याचा प्रयत्न केला आहे व ह्या सिनेमात माझे कैरेक्टर माझ्याच स्टाइलचे आहे, जे बोलण्यापेक्षा सिनेमात पाहणेच योग्य ठरेन.
Comments