प्रिया वारियर बॉलीवुड डेब्यू चित्रपट 'श्रीदेवी बंगलो' द्वारे करत आहे
बॉलीवुड मध्ये साउथच्या कलाकारांचा डेब्यू नेहमीच होत आला आहे. ह्याच श्रृंखलेत आता इंटरनेट सेंशेन प्रिया प्रकाश वारियर चे नाव देखील जोडले गेले आहे. प्रिया वारियर बॉलीवुड डेब्यू चित्रपट 'श्रीदेवी बंगलो' द्वारे करत आहे. सिनेमाचा टीजर मुंबई स्थित द व्यू थिएटर मध्ये रिलीज करण्यात आला. ह्याचे दिग्दर्शन साउथ चे सुप्रसिद्द डायरेक्टर प्रशांत माम्बुली ने केले आहे. चित्रपटांत प्रिया वारियर सोबत अभिनेता प्रियांशु चटर्जी, असीम अली ख़ान आणि दिनेश लाम्बा देखील झळकणार आहे. चित्रपटांचे निर्माता आहेत आरात एंटरटेनमेंट चे एम एन पिम्पले, चंद्रशेखर एस के आणि रोमन गिल्बर्ट. चित्रपटांचे सह निर्माता आहेत राजन गुप्ता आणि मनीष नायर. फोर म्यूजिकस ने सिनेमाला संगीत दिले आहे. सिनेमाचे संपूर्ण चित्रिकरण लंदन मध्ये २५ जानेवारी पासून सुरु होणार आहे.
Comments