चित्रपट ‘अगडबम पार्ट – २’ च्या रायबाला करायची रैम्प मॉडेलिंग
अभिनेत्री तुप्ति भोईर ने मराठी चित्रपट ‘अगडबम पार्ट – २’ मध्ये ह्यावेळी रायबाच्या भूमिके साठी अभिनेता सुबोध भावे ची निवड केली आहे व ह्या चित्रपटांची ७० टक्के चित्रिकरण देखील पूर्ण झाले आहे. नुकतीच ह्या चित्रपटांच्या शूटिंग कवरेज साठी मुंबईतील काही पत्रकार फिल्मसिटी येथील स्टूडियो नंबर ५ मध्ये गेले होते. त्यावेळी ‘अगडबम पार्ट – २’ चा रायबा म्हणजे अभिनेता सुबोध भावे बरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली. चित्रपटांतील रोल बद्दल माहिती दिली व साल २०१७ मध्ये नवीन काय करणार आहे ह्या बद्दल बोलताना सुबोध म्हणाला कि मी आतापर्यत नाटक, मालिका व सिनेमातून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, परंतु २०१७ मध्ये मला जरा हटके असं करायचे आहे. मला रैम्प मॉडेलिंग करण्याची इच्छा आहे.
Comments