चित्रपट ‘कमिंग बैक’ ची स्क्रिप्ट वाचली
अरबाज खान, एन्द्रिता रे, चंद्रकांत
सिंग, हेमंत
पांडे,
विशाल आणि मोहम्मद सलीम यांनी स्विट्जरलैंड मध्ये चित्रपट
‘कमिंग
बैक’
ची स्क्रिप्ट वाचली
चंद्रकांत सिंग यांनी यापूर्वी तीन कॉमेडी सिनेमे आणि
एक सोशल अवेयरनेस चित्रपट ‘सिक्स एक्स’ बनविला आहे. आता एक थ्रिलर सिनेमा ‘कमिंग
बैक’ घेऊन येत आहे, ह्यामध्ये अरबाज खान ची दुहेरी भूमिका आहे. ह्या चित्रपटाची
संपूर्ण शूटिंग अरोसा स्विट्जरलैंड मध्ये करण्यात येणार आहे. सिनेमाचे
निर्माता अहिल्या प्रोडक्शन चे महेंद्र सिंह नामदेव व आरआरडी मोशन पिक्चर्स चे राकेश
दत्ता आहेत. ह्या हिंदी चित्रपटांत कन्नड सुपरस्टार एन्द्रिता रे आहे. अरबाज खान यांनी सांगितले कि ह्या सिनेमात
माझा डबल रोल आहे आणि ह्या पेक्षा जास्त काही सांगू शकत नाही. चित्रपटांची स्क्रिप्ट
दमदार आहे आणि निर्मात्यांच्या मते मी ह्या भूमिकेसाठी एकदम फिट आहे. चंद्रकांत सिंग म्हणाले कि अरबाज खान चा रोल विषम
शैलीचा आहे, जे स्विट्जरलैंड मधील बिजनैस टायकून आहेत व ४० व्या वर्षी एक लहान वयाच्या मुलीसोबत
लग्न करतात. त्यानतंर त्यांची हत्या होती.. ह्या सिनेमातहेमंत
पांडे आणि गोविंद नामदेव देखील आहेत. चित्रपटांची पूर्ण शूटींग स्विट्जरलैंड मध्ये
करण्यात येणार आहे.
Comments