नक्श लायलपुरी, उर्दू कवि, गीतकार,
नक्श लायलपुरी, उर्दू कवि, गीतकार, ज्यांनी
आपल्या जीवनात १३२
संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले, त्यांचे मुंबईत ८९ वर्षी निधन झाले
जगात नक्श लायलपुरी म्हणून
ओळखले जाणारे प्रख्यात उर्दू शायर आणि गीतकार जसवंत राय शर्मा यांचे रविवारी निधन
झाले. ते ८९ वर्षांचे होते. काही
दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्या अंधेरी स्थित राहत्या घरी सकाळी ११.१५ वाजता
शेवटचा श्वास घेतला. पंजाब च्या लायलपुर येथील लायलपुरी १९४० साली हिंदी सिनेमात
कैरियर घडवण्यासाठी मुंबईत आले होते. लायलपुर आता पाकिस्तानचा हिस्सा आहे.
तसे पाहिले तर,
त्यांना गीतकार म्हणून
१९५२ साली पहिला ब्रेक मिळाला होता, परंतु १९७० साला पर्यंत
त्यांना खास असे यश प्राप्त झाले नव्हते. मुंबईत आल्यावर सुरुवातीच्या काळात दैनिक
गरजा पूर्ण करण्याकरिता काही काळ डाक विभागात देखील काम केले.
त्यांनी काही नावाजलेले चित्रपट
दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि
गायकांसोबत काम केले. त्यामध्ये नौशाद, शकंर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लाहिड़ी, जगजीत सिंह आणि काही नावे
आहेत. सुमधुर, रूमानी आणि
भावनात्मक गाणी लिहीली, जी लाखों रसिकांच्या ह्दयाला
स्पर्श करुन गेली.
त्यातील सर्वात उत्तम गाणी समाविष्ट आहेत : ‘मैं तो हर मोड़ पर’, ‘ना जाने क्या हुआ जो तुने छू लिया’, ‘उल्फत में जमाने की हर रस्म को ठुकराओ’ आणि ‘दो दीवाने शहर में’.
टीना
घई ने सांगितले कि काही वर्षा पूर्वी मला माझे वडिल सोडून गेले होते आणि आता सास-यासारखे
वडिल देखील सोडून गेले आहेत. माझ्या डोक्यावरचे मायेचे छत्रच उडून गेले आहेत. अशा
प्रकारे माझ्यावर जास्त माया करणारे दोन्ही वडिल सोडून गेले आहेत. दोन्ही ही
ही-याप्रमाणे होते. ही क्षति कोणीही भरू काढू शकणार नाही. नक्श जी चे शेवटचे गाणं, जे बप्पी लाहिड़ी
द्वारा संगीतबद्ध एक सिनेमासाठी रिकॉर्ड केले आहे.
राजन लायलपुरी म्हणाले कि ते तर माझ्यासाठी परिपूर्ण वैक्यूम प्रमाणे होते .... माझे पिता, माझे शिक्षक, माझे उपदेशक, माझे मित्र होते आणि आता माझे मार्गदर्शक मला सोडून गेले आहेत.
Comments