द ताशकेंट फाइल्स ची सिनेमाघरात ५० दिवस पूर्ण होण्याची पार्टी आणि निर्माता हरीश पटेल यांचा जन्मदिन एकत्र साजरी केला.

एस पी सिने कारपोरेशन चे प्रणय चोक्शी आणि ऐ डी फिल्म्स चे हरीश पटेल यांनी विवेक अग्निहोत्री व पल्लवी जोशी सोबत आपला हिंदी चित्रपट द ताशकेंट फाइल्स ची सिनेमाघरात ५० दिवस पूर्ण होण्याची एक मोठी पार्टी अंधेरी स्थित द लिटिल डोर मध्ये आयोजित केली होती, तेथे चित्रपटांतील कलाकार व पाहुण्यांना आमंत्रित केले होते. हा सिनेमा कलंक सोबत रिलीज़ झाला होता आणि आतापर्यंत सिनेमाघरात चालू आहे. मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, श्वेता बासु प्रसाद, पद्मिनी कोल्हापुरे, हृषिता भट्ट, सोनू निगम, अनु मलिक, मधुर भंडारकर, अब्बास मस्तान, पेन इंडिया चे जयंतीलाल गाड़ा, वीनस चे गणेश जैन आणि काही सुप्रसिद्ध पाहुणे इवेंट मध्ये आले. निर्माता हरीश पटेल यांनी कलाकारांसोबत आपला वाढदिवस केक कापून साजरा केला. ही भव्य पार्टी रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. ह्यालाच म्हणतात एक निशाणा आणि डबल धमाका.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर